मेढा ( प्रतिनिधी ) – भा.ज.पा. कामगार मोर्चा जावली तालुका व कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजना प्राप्त लाभार्थी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
भारतीय जनता पार्टीचे आणि सातारा – जावली विधानसभा आमदार मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार भा.ज. पा. पश्चिम महाराष्ट्र विभाग कामगार मोर्चा सरचिटणीस कामगार नेते. श्री भाईजी गावडे , ओ.बी.सी. जिल्हा महिला अध्यक्षा गीताताई लोखंडे, वैशाली ताई सावंत, सविता गोरे ,जावली तालुका सरचिटणीस गणेश पार्टे, ज्येष्ठ नेते लेले काका, यांच्या उपस्थितीत मौजे करहर येथे इमारत बांधकाम कामगार , आयुष्मान भारत, जनआरोग्य योजना ,ई श्रम कार्ड धारक, उज्वला गॅस कनेक्शन धारक महिला,PM. किसान लाभार्थी यांना प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह देवून सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला.
या वेळी कामगार नेते श्री. भाईजी गावडे यांनी आपल्या मनोगतामधून भारतीय जनता पार्टी ची विचारधारा लाभार्थीना सांगून भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र जी मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपणा सर्वांचे योगदान महत्वाचे असल्याचे सुचित केले. गीताताई लोखंडे यांनी भाजपा महिला सबलीकरण यावर लक्ष देत असून महिलांच्या अडी अडचणी दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास भा.ज.पार्टीचे पदाधिकारी भानुदास ओंबळे,रमेश जाधव, मधुकर बिरामणे, सुनिल जाधव, प्रमोद साळूंखे, आणि लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.लेले काका यांनी तर आभार गणेश पार्टे यांनी मानले. यावेळी उपस्थित लाभार्थीयांनी ” धन्यवाद मोदी जी ” अशा घोषणा करीत कार्यक्रमात रंगत आणली.
केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजना प्राप्त लाभार्थी यांचा सत्कार सोहळा संपन्न
RELATED ARTICLES