बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेमार्फत वास्तु प्रदर्शन रचना – 2019 चे आयोजन
सातारा ः सातारा शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो. असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे आयोजित रचना – 2019 हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे सकाळी 10.00 ते रात्री 9.00 पर्यंत. दि. 7, 8, 9 व 10 फेब्रुवारी 2019 यावेळी आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश विनामुल्य ठेवणेत आला आहे अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेचे अध्यक्ष सयाजी चव्हाण यांनी पत्रकार परिषदे दिली. यावेळी असोसिएशनचे सचिव नितिन माने, उपाध्यक्ष संतोषकुमार जगताप, जाकिर मिर्झा, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी सयाजी चव्हाण म्हणाले की, आपल्या स्वप्नातील घर शोधणार्या, तसेच रिअलईस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणार्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक सुवर्ण संधीच ठरते. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा हे 29 वे वर्ष म्हणून साजरे करत आहे. या वर्षात हे प्रदर्शन भरवताना सातारा शाखा अत्यंत आनंदित आहे. गेली 4 वर्षे हा व्यवसाय थोडासा मंदिच्या संकटातून जात आहे पण अनेक दिग्गज आणि अभ्यासू व्यक्तींकडुन आता या क्षेत्रातील मंदिची लाट ओसरू लागली असुन पुढील काही वर्षे ही या व्यवसायासाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्याच्या सरकारची बदललेली धोरणे या क्षेत्रासाठी पुरक ठरणार आहेत. सातारा शहर व परिसर हा पर्यटन दृष्टया दिवसेंदिवस महत्वाचा ठरू पाहतोय. शिरवळ खंडाळयापर्यंत आलेले औदयोगिक क्षेत्र पुढील टप्पा म्हणून सातारा शहराकडे या पुढील काळात नक्कीच आकर्षित होणार आहे. अशा या विकासासाठी वाटचाल करू पाहणार्या आणि निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या सातारा शहरात स्वत:चे घर असणे किंवा भविष्यकाळासाठी शास्वत गुंतवणूक म्हणून लॅट/प्लॉट/ऑफीसेस् खरेदी करणे ती सुखद भविष्यासाठी नांदी ठरणार आहे.
यावेळी बोलताना असोसिएशनचे सचिव नितीन माने यांंनी सांगितले की रचना – 2019 हे प्रदर्शन म्हणजे केवळ बांधील इमारतीची खरेदी -विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटेरिअर डिझाईन मटेरिअल, मार्केटमध्ये येणारे नव नविन तंत्रज्ञान, प्लंबींग, किचन, गार्डन्स साठी लागणार्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्था. नविन सरकारी धोरणानुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीतकमी व्याज दराने खरेदी दारांना पुरवले जाणार आहे.
त्याच प्रमाणे आत्तापर्यंत जास्त वाटणारे व्याजदरही हळूहळू कमी होणार आहेत. त्यामुळे घर घ्यायची हीच योग्य वेळ आहे. या प्रदर्शनात 101 स्टॉलस् उभारले जाणार असून बिल्डर्स प्रोजेक्टस्, किचन इक्विपमेंटस्, इलेक्ट्रिकल अॅसेसरी, इनोव्हेटिव्ह बिल्डिंग मटेरिअलस्, स्विमिंग पुलस्, गार्डन, फिटनेस, इक्विपमेंटस् अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल.
रचना – 2019 हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्वच सभासद अतिशय मेहनत घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या मध्यवर्ती ग्राउंडवर हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. 4 दिवसात 2 लाखांपेक्षा जास्त लोक शहर, जिल्हा व आजुबाजुच्या क्षेत्रातुन येऊन या प्रदर्शनास भेट देतील. असा आयोजक समितीचा अंदाज असून 60 ते 70 करोडची उलाढाल या प्रदर्शनातून होईल असा विश्वास असल्याचे माने यांनी सांगितले. ना नफा ना तोटा हेच ध्येय समोर ठेऊन सातारा सेंटरतर्फे हे प्रदर्शन आयोजित केले जाते. सर्व सभासद प्रसंगी स्वत:ची कामे बाजुला ठेऊन या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन या व्यवसायास ऊर्जीतावस्था येण्यासाठी व खरेदीदारांना आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर सर्व लोकांना/ व्यावसायिकांना असे आवाहन करते की, जास्तीत जास्त लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. रचना 2019 या वास्तु प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजकत्व कालिका स्टील यांनी स्वीकारले आहे. या प्रदर्शनातील स्टॉल बुकींग साठी नितीन माने – मो.नं. 9422038259 व श्रीराज दिक्षित – मो.नं. 9822070636 किंवा रचना ऑफिस , राजसी शॉपींग मॉल, बीएसएनल ऑफसि समोर, पोवई नाका, सतारा येथे संपर्क करावा. यावेळी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, मेंबर्स मोठया संख्येने उपस्थित होते.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेमार्फत वास्तु प्रदर्शन रचना – 2019 चे आयोजन
RELATED ARTICLES