सातारा दि २१(जि.मा.का):- अतिवृष्टी / भूस्सखलनामुळे सातारा तालुक्यातील सांबरवाडी हद्दीतील सातारा – यवतेश्वर – कास या घाटातील धोकादायक दरड / दगड कोसळल्यास मोठया प्रमाणावर जीवीत व वित्त हानी होणेची शक्यता आहे. यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड / दगड फोडण्याची कार्यवाही दि. 24 जुलै रोजी कार्यकारी अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग , सातारा यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. तरी रविवार दि. 23जुलै2023 रोजी रात्री 12वाजल्यापासून ते सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता सर्वप्रकारच्या वाहतूकीस पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटी यांनी दिली आहे.
तसेच धोकादायक दगड फोडण्याची कार्यवाही सुरु असताना, सदर ठिकाणापासून कमीतकमी 200 ते 300 मीटर परिसरात कोणी व्यक्ती/पशूधनास प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारची जिवीत हानी होऊ नये म्हणून महादरे गावाच्या दक्षिणेकडील बाजूस शेतीच्या कामाकरिता, गुरे राखण्याकरिता व इतर कारणासाठी नागरिकांना जाणेस पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
दि. 23जुलै रोजी रात्री १२ वाजलेपासून दि. 24 जुलै रोजीचे रात्री 12 पर्यंत बोगदा ते यवतेश्वर – कास रस्ता खबरदारीची उपाययोजनेसाठी बंद करणेत येणार असलेने, नागरिकांनी सदर दिवशी पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक करावी असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांनी
सांबरवाडी येवतेश्वर घाटातील धोकादायक दरड/दगड फोडण्याची कार्यवाही बाबत सूक्ष्म नियोजन करुन, सुरक्षिततेचे दृष्टीने सर्व प्रकारच्या योग्य त्या खबरदा-या व उपाययोजना कराव्यात, असे निर्देशीत करण्यात आले आहे.