सातारा ः येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर सातारा च्या देव देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा आज शनिवार दि.22 डिसेंबर 2018 रोजी साजरा होत आहे. कांची कामकोटी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य महास्वामी श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामी यांच्या कृपेने व महास्वामी प.पू. श्री श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य श्री श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचे शुभाशिर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. दरम्यान शुक्रवार दि. 21 रोजी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव तसेच श्री महागपतीचा रथोत्सव संपन्न झाला. तसेच मंदिर परिसरातील श्रीगणपती, आंजनेय, राधघकृष्ण , अय्यपा स्वामी, नवग्रह यांना जलाभिषेक करण्यात आला.. शनिवार दि. 22 रोजी या उत्सवाचा प्रमुख दिवस असून सकाळी पाच वाजता श्री गणपती होम होउन वेद पारायण,मूर्तींचे यात्रादान विधी होउन रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. या वर्षी रथपूजन सोहळयासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. या रथाचे पूजन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. श्री. शेखर चरेगावकर व त्यांच्या पत्नी सौ. गिरीजा चरेगावकर यांच्या हस्ते तसेच सातारा येथील मिनाक्षी हॉस्पीटलचे प्रमुख डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. सौ. रंजीता गोळे आणि हरेश फ्लोअर मिलचे संचालक हरेश दोशी व सौ. वर्षा दोशी या सर्व मान्यवरांचे शुभहस्ते हा रथ पूजन सोहळा संपन्न हाणार आहे. रथपूजन झाल्यावर नटराज मंदीर, जि. प. अध्यक्ष बंगला, साईबाबा मंदिर गोडोली, पोवईनाका येथे येईल .सध्या सुरु असलेल्या परिसरातील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे ेयावर्षी हा रथ शहरात पुढे न जाता शिवतीर्थावरुन हा रथ सोहळा पोवई नाका , कुबेर विनायक मंदिर मार्गे सर्कीट हाउस वरुन नटराज मंदिर येथे सायंकाळी येणार आहे. रथाचे मंदिर प्रांगणात आगमन झाल्यावर सायंकाळी 7 वाजता जिल्ह्यातील विविध देवस्थान व तीर्थक्षेत्राचे महंत व मठाधिपती यांचे हस्ते रथातील देवतांची महामंगल आरती केली जाणार आहे. सातारा शहर परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी पोवंईं नाका परिसरात अवश्य यावेअसे आवाहन संयोजन समितीन ेकेले आहें. रविवार दि. 23 डिसेंबरला सकाळी 5 ते 12 या वेळेत श्री गणपती होम, चर्तुवेद पारायण होउन पुणे येथील श्री राधाकृष्ण शास्त्री मेमोरियल ट्रस्टचे वतीने श्री नटराज व शिवकामसुंदरी देवीस महाभिषेक होउन या देवाचा लग्न सोहळा अर्थात कल्याणोत्सव संपन्न होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद वितरीत केला जाणार आहे. वरील सर्व रथोत्सवाचे कार्यक्रमास सातारकर भावीकांनी तन,मन,धन अर्पून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नटराज मंदिराचे व्यवस्थापकिय विश्वस्त रमेश शानभाग यांनी केले आहे.
श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील देव देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा आज ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे रथ पोवईं नाका येथुनच परत फिरणार
RELATED ARTICLES