Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडी‘श्री सदगुरू’ ने जिल्हयात वेगळा ठसा उमटविला : दिलीपसिंह भोसले

‘श्री सदगुरू’ ने जिल्हयात वेगळा ठसा उमटविला : दिलीपसिंह भोसले

फलटण: सभासदांचे विश्‍वासास पात्र राहुन श्री सदगुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या.फलटण या संस्थेने सातारा जिल्हयात यशस्वी व पारदर्शक कारभार करून एक वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेच्या सातारा जिल्हयात फलटण, लोणंद, दहिवडी, म्हसवड, कोरेगाव, सातारा व शिरवळ अशा एकुण सात शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. सन 2018-19 या संपलेल्या आर्थिक वर्षात एकुण सभासद संख्या 3460 असुन संस्थेचा निव्वळ नफा 1़,04,9़0,759 इतका झालेली माहिती सदगुरू व महाराजा संस्था समुहाचे संस्थापक दिलीपसिंह भोसले यांनी दिली.
सन 2018-19 चे आर्थिक वर्ष संपलेनंतर संचालक मंडळ यांचे समवेत संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती घेणेत आली. सहकारामध्ये आदर्श व पारदर्शक कामकाज केले असलेमुळे श्री सदगुरू हरिबुवा महाराज पतसंस्था नफयाचे उद्दिष्ठ पुर्ण करू शकली असे दिलीपसिंह भोसले यांनी नमुद केले. संस्थेने 12 डिव्हीडंड वाटपाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेस सातत्याने ऑडिट वर्ग अ असून संस्थेची वार्षिक उलढाल 415 कोटी झालेली आहे. संस्थेचा निधी 5 कोटी 39 लाख एवढा आहे. दि. 31 मार्च 2019 अखेर संस्थेकडे रू. 50 कोटी इतकी ठेव असून संस्थेने 37 कोटी 66 लाख इतके कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय 87 कोटी इतका झालेला आहे.संस्थेचे भाग भांडवल रू.2 कोटी 82 लाख असुन खेळते भांडवल रू.62 कोटीचे आहे.
संस्थेने सामाजिक बांधिलकी जपलेमुळे संस्थेचे ठेवीदार व कर्जदार यांनी चांगले सहकार्य केले आहे असे सांगुन दिलीपसिंह भोसले म्हणाले की,़ प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून संस्थेने सभासदांना उत्तम सेवा दिलेली आहे.आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासुनच राबवले़ली वसुली यंत्रणा चांगले कर्जदार मिळण्यासाठी केलेले प्रयत्न सभासद व ठेवीदार यांनी दाखविलेल्या विश्‍वासामुळे संस्था नफ्यामध्ये आलेली आहे.संस्थेने सामजिक बांधिलकी जोपासताना दर महिन्याच्या दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या रविवारी के.के.डोळयांचे हॉस्पिटल पुणे यांचे मार्फत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदु तपासणीचे आयोजन केले जाते.सभासदांसाठी आकर्षक दिनदर्शिकेचे वितरण केले जाते.रक्तदान शिबीराचे आयोजऩ जिजाऊ महोत्सव कोरेगांव तसेच प्रा.शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाला या उपक्रमामध्ये संस्थेचा महत्वपुर्ण सहभाग असतो.तसेच शहिद जवान यांच्या कुटुंबासाठी कृतज्ञता निधी कार्यक्रमामध्ये अग्रस्थानी सहभागी होऊन हातभार लावला जातो असे वेगवेगळे उपक्रम राबवुन संस्थेने सातारा जिल्हयात एक वेगळा नावलौकिक मिळविलेला आह.असेही शेवटी दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular