सातारा : रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकान्वये जुनीमॅगस्ट्रीप आधारित एटीएमकार्ड दिनांक 31 डिसेंबर 2018 पासून बंद होणार असल्याने ग्राहकांना नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएमकमडेबिटकार्ड बदलून द्यावेत असे कळविले आहे. त्यानुसार कार्डाच्या दर्शनी भागाच्या डाव्याबाजूस चिप बसवल्या गेलेल्या नव्या ईएमव्हीचिप आधारित एटीएमकमडेबिटकार्ड बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांना नि:शुल्क बदलून देत आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या सर्वसन्माननीय ग्राहकांना त्यांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिटकार्ड बँकेत जमा करून त्याबदल्यात ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिटकार्ड घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे. हे नवे कार्ड ग्राहकांना नि:शुल्क बदलून दिले जाईल. दिनांक 31 डिसेंबर 2018 नंतर सर्व जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिटकार्ड निष्क्रिय केली जाणार असल्याने त्याचा वापर ग्राहकांना करता येणार नाही. नवे चिप आधारित कार्ड घेण्यासाठी ग्राहक बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही सोईच्या शाखेत जाऊन नवे कार्ड प्राप्त करू शकतात त्यामुळे ग्राहकांना त्यांचे खाते असणार्या शाखेतच जाण्याची आवश्यकता नाही.
नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिटकार्ड जुन्या मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिटकार्डाच्या बदल्यात घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे तसेच एटीएममध्ये पोस्टर्सच्या प्रदर्शनाने आणि एटीएम स्क्रिन्सवरील संदेशाद्वारे कळविले आहे.
1 जानेवारी 2019 पासून जुने एटीएम कार्ड वापरातून बंद होणार
RELATED ARTICLES