Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीकराड दक्षिणसाठी 1 कोटी 79 लाखांचा निधी ; ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे...

कराड दक्षिणसाठी 1 कोटी 79 लाखांचा निधी ; ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून निधी मंजूर ; डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश

कराड : कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी राज्यशासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून 1 कोटी 79 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून, त्याबद्दल भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले व या भागातील नागरिकांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. याबाबत शासनस्तरावर त्यांच्यामार्फत दाखल झालेल्या प्रस्तावांची आणि मागण्यांची दखल घेत मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामीण विकास कार्यक्रमाअंतर्गत 1 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर केला असून, त्याबाबतचा शासन आदेश ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अवर सचिव विजय चांदेकर यांच्या सहीने नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या निधीच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघातील घोणशी, काले, चौगले मळा, झुजारवाडी, टाळगाव, कासारशिरंबे, घारेवाडी, गोंदी, रेठरे खुर्द, सैदापूर, वाठार, नारायणवाडी, काले, मालखेड, नांदगाव, कालवडे, ओंडोशी या गावांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहे. यामध्ये आर.सी.सी. गटारासह रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण, पाणंद रस्ता सुधारणे, मंदिर सभागृह नुतनीकरण, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, सभामंडपाची बांधणी, आर.ओ. जलशुद्धीकरण यंत्रणा बसविणे, तालीम साहित्य खरेदी करणे अशा विकासकामांचा समावेश आहे.
संबंधित विकासकामांस लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याने, कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular