Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वरमधील 1200 विद्यार्थ्यांनी घेतला थ्रीडी आकाशगंगा पाहण्याचा आनंद

महाबळेश्वरमधील 1200 विद्यार्थ्यांनी घेतला थ्रीडी आकाशगंगा पाहण्याचा आनंद

महाबळेश्वर : आजचे युग हे विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे आणि संगणकाचे युग असून महाबळेश्वर इनरव्हील क्लब आणि रोटरी क्लबने शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनींसाठी आयोजित केलेला विज्ञान जगतातील तारांगणाच्या गमती जमती, आकाशातील ग्रहतारे ते समुद्र तळातील सागरी जीव सृष्टीचे थ्रीडी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर्शन हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून याचा उपयोग विद्यार्थी – विद्यार्थीनीं त्यांच्या भावी आयुष्यात सध्याच्या  स्पर्धेच्या युगात नक्कीच होईल असा विश्वास इनरव्हील डिस्ट्रीक- 313 च्या माजी चेअरमन रोहिणी वैद्य यांनी व्यक्त केला.
महाबळेश्वर इनरव्हील क्लब आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आकाशातील ग्रहतारे ते समुद्र तळातीलसागरी जीव सृष्टीचे थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  दर्शन या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा शुभारंभ इनरव्हील डिस्ट्रीक -313 च्या माजी चेअरमन रोहिणी वैद्य यांच्या हस्ते कृत्रिम स्टार बरस्ट डोममची फीत कापून करण्यात आला. यावेळी महाबळेश्वर इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दीपा मार्तंड, नम्रता बोधे, सपना आरोरा, सविता पलोड, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.सुहास जंगम, माजी अध्यक्ष दिलीप रिंगे, राजेश मार्तंड, शिरीष गांधी, धीरेन नागपाल, उमेश कोमटी, मनीष मुक्कावर,प्राचार्य कुंडलिक सरपाले, सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचा लाभ महाबळेश्वर व परिसरातील सुमारे 1200 शालेय मुला-मुलींनी घेतला. तसेच या उपक्रमासाठी मे.अंजनीय प्लेनेटोरीयमसेंटर मुंबईचे सुरेश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दीपा मार्तंड यांनी दिली.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular