सातारा : दि. 25 जानेवारी 2019 रोजी दुपारी 3 वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सत्ता संपादन निर्धार सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला प्रकाश आंबेडकर, खा. असदुद्दीन ओवेसी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत खंडाईत पुढे म्हणाले, देशात सध्या सत्तेत असणारे भाजप आणि मित्रपक्षांनी सत्ता संविधान बदलविण्याकरीता अनेक मार्गाने प्रयत्न केले आहेत. देशात व राज्यात अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्यांक व इतर मागासवर्गीययांचे आरक्षण धोक्यात आणले गेले आहे. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवाद निर्माण केला आहे. त्यामुळे दबलेल्या मागासलेल्या सर्व समाज घटकातील वंचितांची सत्ता निर्माण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन निर्धार सभा दि. 25 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, इमतियाज जलील, अशोकभाऊ सोनोणे, शिवानंद हैबतपुरे, गणपत भिसे, सुकुमार कांबळे, अरुण जाधव, किसन चव्हाण, शंकरराव लिगे, प्रा किसन चव्हाण, वारिस पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व सामाजिक आर्थिक मागास अल्पसंख्यांक अनुसूचित जाती व जमाती व इतर मागासवर्गीय, कामगार, कष्टकरी महिला व इतर सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी लक्ष्मण माने म्हणाले ,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यासंदर्भात छगन भुजबळ यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. लोकसभेला आम्ही 12 जागांची मागणी केली आहे. आघाडी न झाल्यास लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
25 जानेवारीला सातार्यात प्रकाश आंबेडकर, असुद्दिन ओवेसी यांची सभा
RELATED ARTICLES