सातारा : काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-सेना या प्रमुख पक्षाला विरोध करून भारिप-बहुजन महासंघ व एम आई एम आणि इतर घटक पक्षांनी वंचित आघाडीची मोट बांधली आहे.शुक्रवार दि 25 जानेवारी रोजी सातारा शहरातील भिमाई भूमी, गांधी मैदान, राजवाडा चौपाटीवर ऍड आंबेडकर व खा, ओवैसी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जिल्हा समनव्यक मचिंद्र जाधव, अल्ताफ शिकलगार यांनी दिली आहे.
सातारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा, उदयनराजे भोसले यांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी ऍड, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रखर विरोध केला होता. राष्ट्रवादी नेते शरद पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या वर खा. बॅरिस्टर असुउद्दिन ओवैसी यांनी सुरुवातीपासून टीका केली आहे.
त्यामुळे सातार्यातील जाहीर सत्ता संपादन निर्धार सभेला हे दोन महान नेते काय बोलणार?याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सातारा जिल्हात अनेक वंचित घटकाला विकासापासून वंचीत ठेवण्यात आले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, महामाता भिमाई आंबेडकर स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय,डॉ, आंबेडकर यांचे बालपण गेलेले सदर बझार येथील बंगला व प्राथमिक शिक्षण झालेले शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. तसेच अल्पसंख्याक समाजाला आरक्षण असूनही विविध क्षेत्रात संधी मिळाली नाही. त्यामुळे वंचित आघाडी ची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. याचा धसका राजकीय पक्षांनी सुद्धा घेतला आहे.
या दोन नेत्यांना समवेत पदंमश्री लक्ष्मण माने, आ. इम्तियाज जलील,आ. वारीस पठाण, माजी आ.हरिभाऊ भदे, प्रा. सुकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सभेचे अध्यक्ष स्थान चंद्रकांत खंडाईत भूषविणार असून सातारा जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.
दुपारी दोन वाजता सभेचे आयोजन केले आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील काही प्रमुख मंडळी हे ऍड. आंबेडकर व खा. ओवैसी यांची भेट घेण्यासाठी आतुर झालेले आहेत. त्यांनी तशी काही आयोजकांकडे विनंती केली असल्याचे समजते. सभेला मोठी गर्दी होणार असल्याने सातारा शहर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सातार्यातील वंचित आघाडीच्या दि 25 जानेवारीच्या सभेकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष
RELATED ARTICLES