Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीम्हसवड सिध्दनाथाचा 27 नोव्हेंबर रोजी रथोत्सव

म्हसवड सिध्दनाथाचा 27 नोव्हेंबर रोजी रथोत्सव

म्हसवड : सिध्दनाथाच्या नावाचं चांगभलं, च्या गजरात ढोलाच्या निनादात शेकडो मानकरी यांच्या उपस्थितीत बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी होणार्‍या रथोत्सवासाठी रथगृहातुन बाहेर काढण्यात आला व रथाचे तोंड फिरवून ते पूर्व दिशेस करण्यात आले
बुधवार दि.27 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या म्हसवड यात्रेच्या पार्श्वभुमिवर आज कार्तिकी एकादशी दिवशी रथाच्या मानकर्‍यांच्या उपस्थितीत श्रींचा रथ रथगृहातुन काढण्यात आला त्यामुळे खर्‍या अर्थाने आजपासुन म्हसवड यात्रेला सुरवात झाली असुन यात्रा मैदानात दुकाने उभा करण्याची यात्रेकरूंची लगबग सुरू झाली आहे
दिपावली पाढव्या दिवशी श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी ना हळदी लावुन सुरू झालेल्या श्री चा लग्न सोहळ्याची सांगता 27 नोव्हेंबर वरदाव्याने म्हणजेच रथोत्सव यात्रेने होत असते याच यात्रेच्या पार्श्वभुमिवर आज कार्तिकी एकादशी दिवशी रिंगावण मैदानावर असलेल्या रथगृहातुन श्री चा रथ मानकर्‍याच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला यावेळी रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, प्रतापसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजीराजे राजेमाने तेजसिंह राजेमाने सह सिध्दनाथ मंदिराचे सालकरी कीर्तने मठाधिपती रविनाथ महाराज, नगराध्यक्ष तुषार विरकर, युवराज सुर्यवंशी कैलास भोरे, विकास गोंजारी सदस्यांच्या उपस्थितीत हा रथ रथगृहातुन बाहेर काढण्यात आला यावेळी रथ ओढण्याचा मान असलेल्या माळी समाजाचे मानकरी पिसे, म्हेत्रे, लिंगे,अबदागिरे,कोले, केवटे, खासबागे, दहिवडे, तर लोहार, सुतार, डवरी, घडशी समाजातील आदीसह मानकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने म्हणाले सालाबाद प्रमाणे याहि वर्षी ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी चा रथोत्सवाची यात्रा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी हि सर्व गावकर्‍यांची असुन रथ ओढण्याचा मान हा माळी समाजाचा असुन या समाजानेही दरवर्षी रथ प्रदक्षिणा पुर्ण करण्याची दक्षता घेते यावर्षी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रथ मार्ग बदलून बायपास रोडने रथ बस स्थानक चौकात नेहण्यात येणार आहे. वडजाई ओढ्याचे काम सुरु असल्याने रथ नव्याने बांधलेल्या पुलावरुन जोतीबा मंदिरा नजीक थांबवून या ठिकाणी नवसाची मुले रथावरुन टाकण्याची पूर्वीपासुनची प्रथा याठिकाणी होणार आहे असे मानकरी अजितराव राजेमाने यांनी सांगीतले
आज कार्तिकी एकादशी दिवशी श्रीं चा रथ रथगृहातुन बाहेर काढण्यात आला असल्याने आता खर्‍या अर्थाने म्हसवड ची यात्रा सुरू झाली असुन या यात्रेत यात्रेकरूंना पालिकेतर्फे जागांचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. यात्रेतील यात्रेकरूंची दुकाने, पाळणे, मेवामिठाईची दुकाने, हॉटेल, खेळण्यांची दुकाने उभी करण्याची लगबघ सुरू झाली असुन येत्या 27 नोव्हेंबर रोजी म्हसवड चा रथोत्सव होत असुन या यात्रेस भाविकांनी मोठ्या संखेने हजेरी लावुन श्रींचा अशिर्वाद घ्यावा असे आवाहनही यावेळी मानकर्यांकडुन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular