वाठार स्टेशन (संजय कदम) : ऊस वाहतुकीमुळे होणार्या विविध अपघातात राज्यात आज अनेकांचे बळी जात आहेत. ऊस प्रादेशिक परिवहनच्या नियमानुसार ऊस वाहतूक करणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना ऊस वाहतूकीच्या मर्यादा ठरवून दिल्या असताना सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्यातील ट्रॅक्टर ट्राली वाहतूकदाराने तब्बल 54 टन ऊसाची वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. मात्र या विक्रमाची शिक्षा याला या कारखान्याकडून करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या राज्यभर ऊसाचा गाळप हंगाम सुरु आहे. या दरम्यान बैलगाडी, मुंगळा बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक या वाहनाद्वारे ऊसाची वाहतूक सुरु आहे. मात्र ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने ही बेकायदेशीरपणे अवाजवी वाहतूक करत असल्याची बाब सर्वच कारखान्याकडे दिसत आहे. उपप्रादेशिक परिवहन ने अन्य वाहतूकीच्या प्रमाणेच ऊस वाहतूकीलाही निर्बंध घातले आहेत असे असताना सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याचे सचिव भिमराव मुळे या ऊस उत्पादकाचा ऊस अनिता संभाजी शिंदे (ट्रॅक्टर नं. एम एच-13-3666) या वाहनाच्या दोन ट्रेलरमधून भरुन या कारखान्याकडे आला आहे.
विशेष बाब म्हणजे या कारखान्याच्या वजन काट्याची क्षमता 50 मे टन असल्याने या कारखान्याने एक – एक ट्रेलरचे वजन या काट्यावर केले यामध्ये दोन्ही ट्रेलरचे वजन 54 किलो एवढे भरल्याने ऊस वाहतूकीचे एक प्रकारे रेकॉर्ड ब्रेक करण्याचे काम या वाहतूकदाराने केले आहे.
मात्र वाहतूकीबाबतची नियमावली न पाळल्याने या वाहनातून वाहतूक केलेल्या वाहतूकदारास तसेच ज्या तोडणी यंत्रणेकडून हा ऊस वाहनात भरला त्या तोडणी मुकादमास या कारखान्याने प्रत्येकी 10 हजाराचा दंड केल्याची माहिती या कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र रणवरे यांनी ग्रामोध्दारशी बोलताना दिला आहे.
मात्र ऊस वाहतुकीची मर्यादा रोखण्यासाठी आज प्रादेशिक परिवहन विभागानेही पाऊले उचलली आहेत त्यामुळे कारखानदारानीं आपल्या तोडणी व वाहतूकदारांना ओव्हरलोड वाहतूक न करण्याबाबत आवाहन करणे गरजेचे आहे.
ओव्हरलोड वाहतुकीचा नियम सर्वच वाहनांना बंधनकारक आहे त्याचे पालन करणे ही त्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील ऊस वाहतुकीबाबत आम्ही जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांना यापूर्वी सूचना केल्या आहेत. प्रत्येक ऊस वाहतुकदाराने आपल्या वाहनामुळे वाहतुकदारांचे नियमांना तडा जाईल असे वर्तन करु नये यामध्ये जास्त उंचीपर्यंत माल भरु नये, पाठीमागे रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक आहे अशा सूचना केल्या आहेत.
– संजय धायगुडे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (सातारा)