म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने) :- म्हासुर्णे ता.खटाव येथे जेष्ठ नागरिक संघटनेचा सहावा वर्धापन दिन महादेव मंदिरात म्हासुर्णे येथे साजरा करण्यात आला.प्रत्येक वर्षी जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने वेगळे वेगळे उपक्रम राबवले जातात.त्या उपक्रमातुन जेष्ठ नागरिकांना प्रेरना मिळते.प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या विषयांवर जेष्ठ नागरिकांना उपयुक्त अशा विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
यावेळी प्रमुख पाहुणे योग शिक्षक आबासो कदम (सर) कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा.श्री.हरिचंद्र माने,शिक्षण संल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,मा.उपसरपंच सुहास माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,आबा यमगर,गुलाब वायंदडे सौ.कुसुम माने,नलिनी कुलकर्णी ,एम.पी.माने साहेब,राजाराम कुलकर्णी(सर),पांडुरंग माने(गुरुजी),किसन माने (बापु),व्हि.एल कुलकर्णी,जयश्री इनामदार,दिपा कुलकर्णी,यांची प्रमुख उपस्थित होते,
वर्धापन दिनाचे औचित्य साधुन ८५ वर्षे व त्याहुन अधिक वर्षे झालेल्या श्री.शांताराम कुलकर्णी ,श्री.महादेव माने ,सुमन कुलकर्णी ,श्री.मोतीराम माने,श्री जेष्ठ नागरिकांचा सन्मान संघटनेच्या वतीने करण्यात आला. तसेच जोतिर्लिंग जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने दहावी मध्ये उत्तीर्ण झालेले व श्रीराम विद्यालय म्हासुर्णे शाळेत प्रथम मिळवल्याबद्दल प्रकल्प प्रकाश वेदपाठक ८७.८०% गुण मिळवल्याबद्दल व माणसी महेश कुलकर्णी हिने ९५% मार्क मिळवलेबद्दल यांचा जेष्ठ नागरिक संघ यांच्या वतीनेसत्कार करण्यात आला.व महादेव माने,दिपा कुलकर्णी,जयश्री इनामदार,शांताराम कुलकर्णी ,हरिचंद्र माने,व्हि.एल.सर यांच्या वतीनेही प्रकल्प वेदपाठक व माणसी कुलकर्णी यांना बक्षिस देण्यात आली
या कार्यक्रमादरम्यान बोलताना आबासो कदम सर म्हणाले,कि ज्या गुरुनी मला ज्ञान दिले त्या ज्ञानाच्या जोरावर मी आपणासमोर उभा आहे आणि तो गुरू म्हणजे माझी आई.जे माझ्या कडे अॉर्ट अॉफ लिव्हिगच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान मला समाजाला द्यायचे काम मला करायचे आहे. जेष्ठ नागरिकांनी मला येवढेच सांगायचे आहे कि तुम्ही किंवा आपण या टप्प्यावर पोहचलो ही ईश्वराची कृपा आहे.आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी उतार वयात जेष्ठांनी तणाव कमी करा हसरा चेहरा ठेवा म्हणजे आरोग्य चांगले राहिल.लहान मुले दिवसातून तीनशे ते चारशे वेळा हसतात.पण आपण एक दोन वेळा पण हसत नाही म्हणून मला येवढेच सांगायचे आहे हसतमुख चेहरा ठेवल्याने आरोग्य तर चांगले राहतेच व त्याबरोबर वयोमर्यादा पण वाढते.परमेश्वराने आपल्याला करोडो रुपयाचे शरीर दिले आहे तरी मग आपण दुःखी का म्हणून सर्वांनी असणारे आयुष्य आनंदी रहा.दिवसातून एखदा स्मरण करा.नम्रतेशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही म्हणून सर्वांनी स्वतःवर प्रेम करायला शिका व आनंदी रहा.आनदी रहाण्यासाठी सात गोष्टी सांभाळा शरीर,श्वास,बुद्धी,मन,स्मृती,अहृम,आत्मा या गोष्टी साःभाळणे आवश्यक आहे.म्हणून शेवटी सांगता कदम म्हणाले सुंदर जन्म आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्या. व्यायाम ,योग केल्याने आजारापासुन दुर राहता येते.सुखाला भारावुन न जाता येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जावे.हे सर्व जेष्ठांनी आचरणात आणले तर आपले आयुष्य आपण आनंदाने जगु शकतो.यावेळी आबासो कदम यांच्या पत्नी सौ.कदम याही उपस्थित होत्या.सौ कदम यांचाही सत्कार जेष्ठ नागरिकांच्या वतीने करण्यात आला.
व्हि.एल कुलकर्णी (सर), हरिचंद्र माने,विलास माने भाऊ यांची भाषणे झाली.विलास माने,बबन माने,भिमराव माने,एम.पी.माने (साहेब),रघुनाथ माने,शिवाजी माने,तुळशिराम माने,जे.वाय.सर,आनंदा चव्हाण,उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय आर.जी.कुलकर्णी (सर)यांनी करुन दिला.प्रास्तविक व सुत्रसंचालन राजाराम कुलकर्णी (सर)यांनी केले.व्हि.एल कुलकर्णी सर यांनी आभार मानले.
म्हासुर्णेत जेष्ठ नागरिक संघटनेचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा ; दहावी उत्तीर्ण व जेष्ठ नागरिकांचा सन्मान
RELATED ARTICLES

