कोरेगाव: सामाजिक बांधिलकी जोपासत बँक ऑङ्ग महाराष्ट्रने महिला सक्षमीकरणामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. महिलांच्या चेहर्यावरचे खरे हास्य हाच बँकेचा खराखुरा नङ्गा आहे, असे गौरवोदगार बँकेचे कार्यकारी संचालक हेमंत टमटा यांनी काढले.
बँक ऑङ्ग महाराष्ट्रच्यावतीने जिल्ह्यातील महिला बचत गटांना कर्ज वाटप टमटा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक यशवंत थोरात, बँकेचे सल्लागार वसंत म्हस्के, विभागीय व्यवस्थापक हरिश्चंद्र माझिरे, अग्रणी बँक अधिकारी महादेव शिरोळकर, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुबोध अभ्यंकर, कांबळे, शाखा व्यवस्थापक शीतल बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार स्मिता पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.
टमटा पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात बँकेचे कामकाज आदर्शवत असून, शासनाच्या सर्व योजना अत्यंत शिस्तबध्दपणे बँकेने राबविल्या असून, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. सामान्यांची आर्थिक पत उंचावत असताना महिला सक्षमीकरण हे देखील महत्वाचे कार्य बँकेच्या हातून घडत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांनी बँक राबवित असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. मेळाव्यात 95 जणांना 2 कोटी 47 लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. जिल्हा आर्थिक साक्षरतेचे प्रमुख नितीराज साबळे यांनी सूत्रसंचालन केले. हरिश्चंद्र माझिरे यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. शीतल बर्गे यांनी आभार मानले.
‘महिला सक्षमीकरणामध्ये महाबँकेचा मोलाचा वाटा’
RELATED ARTICLES

