सातारा : पुणेे येथील सूर्यदत्त शिक्षण संस्थेच्या विद्यमाने गेली 16 वर्षे शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, संगीत, सामाजिक सेवा, अर्थशास्त्र, बँकिंग व क्रीडा या क्षेत्रात ज्यांनी विशेष कामगिरी केली आहे अशा व्यक्तींना पुरस्कार दिला जातो. यावर्षी ज्योतिष क्षेत्रात अभ्यास, व्यासंग व संशोधन या कामगिरीबद्दल प्राचार्य रमणलाल शहा यांना सूर्यदत्त नॅशनल लाईफटाइम अॅचिव्हमेंट अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार गुरुवार, दि. 7 फेब्रुवारी 2019 रोजी पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, संगीत, समाजसेवा, क्रीडा, अर्थशास्त्र, बँकिंग इ. क्षेत्रातील विशेष करणार्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये भारतरत्न भीमसेन जोशी, पद्मविभूषण बिरजू महाराज, हरिप्रसाद चौरसिया, उदित नारायण, रामदेव बाबा तसेच मोहन धारिया, बाबासाहेब पुरंदरे, अण्णा हजारे, बाबा आमटे, विजय भटकर तसेच पद्मभूषण कृष्णस्वामी कस्तुरीरंगन, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, वसंत गोवारीकर, सौ. अमृता फडणवीस, शीला सत्यनारायण, सुप्रिम कोर्टाचे न्यायमूर्ती श्रीकृष्ण , विद्यापीठाचे कुलगुरू अरुण निगवेकर, भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव व किरण बेदी, पद्मश्री कुमार केतकर, बाळासाहेब जाधव अशा मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील व भारतातील विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी केलेल्या जवळजवळ 100 पेक्षा अधिक व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
प्राचार्य रमणलाल शहा यांना सूर्यदत्त शिक्षण संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर
RELATED ARTICLES

