तळमावलेः माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना खूप मोठी आहे, असे मत झी मराठी या वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील राणूआक्का फेम अश्विनी महांगडे यांनी काढले. त्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या भव्य राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी विजया पालव, गुन्हे अन्वेषण विभाग कराड चे स्वप्नील लोखंडे, उद्योजक सर्जेराव यादव, डॉ.कोमल कुंदप, लिम्का बुक होल्डर डॉ.राजेंद्र कंटक, कोरियोग्राफर मिनल ढापरे, लागीर झालं जी फेम लक्ष्मी विभूते, सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, अॅड.विठ्ठलराव येळवे, सपोनि चंद्रकांत माळी, चंद्रकांत चाळके, प्रा.ए.बी.कणसे, हवालदार गुलाब जाधव, राजाराम डाकवे, गयाबाई डाकवे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अश्विनी महांगडे पुढे बोलताना म्हणाल्या, पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन हा पुरस्कार देवून गौरव केला ही बाब मोठी कौतुकास्पद आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 4 वर्षे अनेक उपक्रम राबवत आहे. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील चांगले कार्य करणार्या मंडळींच्या कौतुक सोहळ्यात माझं कौतुक केलं ही अभिमानाची बाब आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही गोष्ट मनात ठेवून संदीप डाकवे यांनी स्पंदन टस्ट च्या माध्यमातून हा मोठा उपक्रम सुरु केला आहे. आज अशी असंख्य माणसं एकमेकांचा हात हातात घेवून उभी राहत ज्या पध्दतीने सर्व लोक इथं एकत्र आलीत आणि हा आनंद सोहळा पाहत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. याप्रसंगी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने राबवलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे अश्विनी महांगडे यांनी मनापासून कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ज्यांना समाजाची स्पंदन समजतात त्याच व्यक्ती भविष्यात गौरवशाली परंपरा निर्माण करु शकतात ती उमेद संदीप डाकवे यांच्यामध्ये असून त्यांच्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे असे मत गुन्हे अन्वेषण कराड चे प्रमुख स्वप्नील लोखंडे यांनी व्यक्त केले. खडतर परिस्थितीतून येवून संदीप डाकवे हे समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत असेही ते पुढे बोलताना म्हणाले. दरम्यान दिवाळी अंक स्पर्धेतील विजेते, तसेच गणेशोत्सव वार्तांकन स्पर्धेतील विजेते पत्रकार यांचाही यावेळी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तक देवून गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी विजया पालव, यशस्वी उद्योजक सर्जेराव यादव, डॉ.कोमल कुंदप, अॅड.विठ्ठलराव येळवे, डॉ.राजेंद्र कंटक, पद्मश्री डॉ.विजया शहा, सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, प्रा.दादाराम साळुंखे, सौ.सुरेखा भोसले यांनीही आपली मनोगते व्यक्त करत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाचे पूजन करुन आणि त्याला पाणी घालून वृक्षसंवर्धनाचा संदेश देत करण्यात आली. याशिवाय उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल व श्रीफळ यांनी न करता संदीप डाकवे यांनी तयार केलेल्या त्यांच्या नावातील अक्षरगणेश चित्र आणि शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार हा पुस्तक देवून करण्यात आले. त्यानंतर स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कार्यअहवालाचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) येथील सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून मोठया संख्येने लोक आले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर शेवाळे, अशोक मोहने, संदीप चेणगे, जीवन काटेकर, विशाल डाकवे, सुरेश मस्कर, अनिकेत पाटील, अनिल देसाई, सौ.पुनम जाधव तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे, सुत्रसंचालन सुरेश जाधव व बाबा काळोखे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.ए.बी.कणसे यांनी केले.विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचंड गर्दीत प्राईड ऑफ स्पंदन कार्यक्रम यशस्वी पार पडला.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना खूप मोठी ः अश्विनी महांगडे
RELATED ARTICLES