सातारा : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने ज्येष्ठांच्या प्रलंबित मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस. टी. महामंडळाने शिवशाही बसमध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत द्यावी, ज्येष्ठ नागरिक धोरणाची अंमलबजावणीबाबत संबंधीत विभागाची त्वरीत बैठक घ्यावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी कृतीसमिती मंत्रालयात स्थापन करावी, त्यात ज्येष्ठांच्या प्रत्यक महसुल विभागातील घेण्यात यावा, दरवर्षीच्या अंदाजपत्रकात ज्येष्ठांच्या योजना सुविधांवर तरतुद करण्यात याव्यात, श्रावण बाळ व इतर योजनेमध्ये दरमहा तीन हजार वाढ करावी, बंंद मातोश्री वृध्दाश्रम सुरु करावेत या व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. नंदलाल कुलकर्णी, डॉ. वैशाली भोसेकर, सुरेश बारटक्के, कोषाध्यक्ष रघुनाथ मोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
RELATED ARTICLES