सातारा : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन ल़ि, मुंबई यांचेवतीने सातारा जिल्हा मध्य ़सह ़बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ऱाजेंद्र सरकाळे यांना सन 2018 या वर्षासाठी कै ़बापूरावजी देशमुख उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक कर्मचारी पुरस्कार पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित करणेत आले.
सदर पुरस्कार महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचे हस्ते डॉ.राजेंद्र सरकाळे यांनी स्विकारला ़ यावेळी महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, महा ऱाज्य बँक्स असेा़ च्या कार्याध्यक्षा सुप्रिया पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक दत्तात्रय ढमाळ, व्यवस्थापक सुजित शेख व अन्य मान्यवर उपस्थित होते ़
यावेळी ना. रविंद्र चव्हाण म्हणाले देश पातळीवर सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले डॉ. सरकाळे यांचे बँकिंग कामकाजाबरोबरच शेती विकासाचे कामकाजही आदर्शवत व प्रेरणादायी आहे.
डॉ. सरकाळे यांनी हॉर्टिकल्चर ऑफिसर पदापासून मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर प्रभावी कामकाज केलेले आहे. विविध सहकारी संस्थांचे उभारणीत मौलीक मार्गदर्शन केलेले आहे. महिला बचत गट व त्यांचे विपणन व्यवस्थेबाबत सातत्याने बचतगटांना मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात.
बँकिंग कामकाजाबरोबरच शेती विषयक 5 पुस्तके प्रकाशित केली आहेत ़ सातारा आकाशवाणीवरून कृषि तंत्रज्ञानाविषयी सहा महिन्यांचे मालिकाचे प्रसारण केले ़ दूरदर्शन, मुंबई तसेच सहयाद्री वाहिनी व सुकृत चॅनेल्सचे माध्यमातून जवळपास 50 कार्यक्रमांव्दारे शेतीविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे ़ ग्रीन हाऊस, जलसंधारणाचे महत्व याकरिता माहितीपटांंची निर्मिती केली ़ शेती विषयक विविध संस्थांमध्ये प्रशिक्षणार्थींना व्याख्याने तसेच प्रशिक्षण दिले ़ याच बरोबर विविध शेती तसेच इतर महत्वाच्या संस्थांवर तज्ञ संचालक व मार्गदर्शक अशी जबाबदारीची पदे भूषविली आहेत.
डॉ ़सरकाळे यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध राष्ट्रीय स्तरावरील संस्थामार्फत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. त्यांच्या आत्मियतेने कामकाज करणेच्या पध्दतीची नोंद घेवून बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांच्या चीन, जपान व हाँगकाँग, अमेरिका या देशातील झालेल्या अभ्यास दौ-यात समावेश केला होता़
तसेच महाराष्ट्र शासनामार्फत विविध 30 देशांना कृषि विषय अभ्यासाकरिता भेटी दिल्या असून सर्वंकष बाबींची नोंद घेवून त्यांना विविध संस्थांनी जवळपास 18 राष्ट्रीय राज्यस्तरावरील पुरस्कारांनी सन्मानीत केले आहे. डॉ राजेंद्र सरकाळे यांना याआधी बँकिंग फ्रंटायर्स मुंबई व कर्नाडस् बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, कोल्हापूर यांचेवतीने उत्कृष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी या पुरस्काराने सन्मानित केलेले असून राज्य बँक असोसिएशनच्या या पुरस्कारासह डॉ राजेंद्र सरकाळे यांनी हॅट्ट्रीक पूर्ण केली आहे .डॉ.राजेंद्र सरकाळे यांना सदर पुरस्कार मिळालेबद्दल बँकेचे अध्यक्ष आ. श्रीमंत छ ़ शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र विधान परिषद सभापती व बँकेचे संचालक ऩा ़ श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, सर्व संचालक मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, बँकेचे सरव्यवस्थापक एम ़व्ही ज़ाधव, सर्व विभागांचे व्यवस्थापक अधिकारी व सेवक, गटसचिव, सहकार क्षेत्रातील आजी-माजी, विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या .़
डॉ़ राजेंद्र सरकाळे ‘कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट बँक कर्मचारी’ पुरस्काराने सन्मानित
RELATED ARTICLES