महाबळेश्वरः पर्यटकांसह स्थानिक नागरीक व तेथील स्टॉल धारकांच्या सोईसाठी वेण्णालेक बोटक्लब जवळ बसविलेले पिण्याच्या पाण्याचे ए टी एम मशीन चालु करण्याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने ते जागेवरच धुळ खात पडले आहे अधिक चौकशी केली असता वॉटर एटीएम् मशिन निकृष्ठ दर्जाचे असल्याने ते चालुच होत नाही ही माहीती समोर आली आहे त्या मुळे वॉटर एटीएम ची रक्कम वाया गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे
केंद्र शासनाने नगरपालिकासाठी स्वच्छता अभियान 2018 ही स्पर्धा जाहीर केली होती या स्पर्धेत उतरलेल्या महाबळेश्वर व पांचगणी पालिकेने या स्पर्धेत अव्वल येण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला या प्रयत्नात पांचगणी पालिकेला यश आले देशात पांचगणी आपल्या गटात अव्वल क्रमांकाने जिंकली पंरतु महाबळेश्वर पालिकेने खुप कष्ट घेवुनही पहील्या टॉप पंधरा मध्ये प्रवेश मिळाला नाही महाबळेश्वर पालिका कशी बशी 19 व्या स्थाना पर्यंत पोहचली पालिकेच्या नियोजन शुन्य व गलथान कारभारामुळे महाबळेश्वर पालिकेला 19 व्या स्थाना पर्यंत पोहचताना चांगलाच घाम आला होता स्वच्छता अभियानात ज्या ज्या गोष्टीसाठी मार्क होते त्या गोष्टी खरेदी करण्याचा सपाटा पालिकेने लावला होता पर्यटकांच्या सोईसाठी असे लेबल लावुन पालिकेने एक वॉटर एटीएम मशीन खरेदी केले व ते वेण्णालेेक जवळील टोल नाक्यावर बसविले परंतु दुर्दैवाने पहील्या दिवसा पासुन ते मशीन आज पर्यंत बंद अवस्थेत धुळ खात पडले होते या संदर्भात दोन महीन्या पुर्वी दैनिकात वृत्त प्रसिध्द करून पालिकेचे लक्ष वेधण्यात आले होते बातमीची दखल घेवुन पालिकेचे कारभारी यांनी तातडीने हालचाली सुरू पाण्याचे एटीएम मशीन टोल नाक्या वरून हलवुन ते बोटक्लब जवळ बसविण्यात आले या मशीनला तातडीने पाण्याची लाईनही जोडण्यात आली व ते मशीन सुरू करण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू केले या मशीन मध्ये पाच रूपयांचा कॉईन टाकल्या नंतर एक लिटर पाणी मिळण्याची सोय या मध्ये करण्यात आली आहे याचा लाभ पर्यटकांना तर होणार होता तसेच तेथे असलेले घोडेवाले स्टॉल धारक बोटक्लबचे कर्मचारी यांनाही होणार होता अनेक प्रयत्न करूनही पालिकेला हे मशीन चालु करण्यात आज पर्यंत यश आले नाही प्रयत्न करूनही हे मशीन चालु होत नसल्याने पालिकेने मशीन चालु करण्याचे प्रयत्नही सोडुन दिले आहे ज्या खाजगी ठेकेदारा कडुन हे मशिन खरेदी केले तो ठेकेदारही या मशिन कडे फिरकत नसल्याने पाच रूपयात एक लिटर शुध्द पाणी हे पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले गाजर ठरले आहे.
वॉटर एटीएम मशिन धुळखात पडून
RELATED ARTICLES

