फलटण : माढा मतदारसंघातील फलटण येथे शरद पवार यांचा मेळावा सुरू होता. माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यातील धगधग उफाळून आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा अनुभव आला. शरद पवार यांच्या भाषणावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या गोंधळामुळे शरद पवारांना भाषण थांबवाव लागलं. या वादामुळे माढा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात असलेली खदखद चव्हाट्यावर आली आहे.
माण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारकीच्या स्पर्धेतील शेखर गोरे आणि कविता म्हेत्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वादातून कविता म्हेत्रे स्टेजवर बसल्यामुळे शेखर गोरे यांनी स्टेजवर न येण्याचा निर्णय घेत खाली बसले. सर्वांनी त्यांना स्टेजवर येण्यासाठी विनंती केली, मात्र ते स्टेजवर न जाता खालीच बसले. यानंतर कविता म्हेत्रे यांनी भाषणाला सुरुवात करताच, शेखर गोरे यांच्या समर्थकांनी सर्व सांगा, खरं सांगा, असं म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली. हा वाद इतक्या टोकाला गेला की यात पोलिसांना मध्यस्थी करत सर्वांना खाली बसण्यास विनंती केली. खुद्द शरद पवारांनीही पुढाकार घ्यावा लागला. तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शरद पवार हताश होऊन आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा वाद पाहत राहिले.
फलटण सभेत शरद पवारांसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राडा
RELATED ARTICLES