सातारा : गावातील राजकारण हे निवडणूकीपुरते असले पाहिजे तरच त्या गावाचा विकास होणार आहे. सातारा तालुक्यातील कातवडी बु. या गावातील ग्रामस्थांनी राजकारणाला थारा न देता ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करुन एक आदर्श निर्माण केला आहे. नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन करतानाच कातवडीच्या सर्वांगिण विकासासाठी वाट्टेल ते सहकार्य करु, अशी ग्वाही आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा तालुक्यातील कातवडी बु. या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूकीत बिनविरोध झाली असून सरपंचपदी हणमंत राणू देवरे यांची तर, सदस्यपदी बाळु बंडू देवरे, श्रीमती लता सखाराम देवरे, जगाबाई शंकर देवरे, शामराव कोंडिबा लोटेकर, नंदा श्रीरंग लोटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, काशिनाथ घाग, रघुनाथ लोटेकर, किसन घाग, शंकर देवरे, गणपत केरेकर आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे करुन गावाचा कायापालट करावा.
राजकारण हे निवडणूकीपुरते असते. त्यामुळे निवडणूक संपली असून कोणताही गटतट असा भेदभाव न ठेवता सर्वांनी मिळून निवडणूक बिनविरोध करुन एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे नवनर्विाचित पदाधिकार्यांनी गावाचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न करुन ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
आ. शिवेंद्रसिंहराजेंकडून कातवडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचा सत्कार
RELATED ARTICLES