मसूर : बेलवडे हवेली ता.कराड येथे शिवलिलामृत ग्रंथ सामुदायिक पारायण सोहळा विविध धार्मिक, आध्यात्मिक उपक्रमांनी साजरा झाला.
या कालावधीमध्ये श्रींना अभिषेक, महाआरती, हरिपाठ, ग्रंथवाचन, महारूद्र स्वाहाकार, भजन, किर्तन, प्रवचन व महाप्रसाद आदि उपक्रम राबविले गेले. यानिमित्त आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीराचे व पालखीचे मुख्य चोपदार बाळासाहेब चोपदार हे सहकुटूंब उपस्थित राहीले व शंभू महादेवास अभिषेक केला, या दिवशी दिवसभर व सप्ताह कालावधीमध्ये सातारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविक भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती.
नवसाला पावणारा म्हणून पावकेश्वर महादेव अशी या दैवताची ख्याती सबंध महाराष्ट्रात आहे. या सोहळयाची भव्य दिव्य दिंडीने सांगता झाली. या संपूर्ण उत्सवात श्री केदारनाथ महाराज, ऊँ चैतन्य धर्मपुरी (दिलीपपुरी) मठाधिपती औंध, ऊँ चैतन्य अशोकपुरी औंध, ह.भ.प. बाळासाहेब चोपदार, देवाची आळंदी, ह.भ.प. बाजीरावमामा कराडकर, गिरीशशास्त्री वरूडकर इ. मान्यवरांची उपस्थिती होती. दिंडीत आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिवकालीन तुतारी लोककला मंडळ पश्चिम महाराष्ट्राचे तुतारीवादक, ज्ञानमंत्र वारकरी शिक्षणसंस्था, विहापूर, मायाक्का गजवाद्य उंब्रज परिसर, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ तासवडे, विविध ठिकाणचे नामांकित अश्व, भजनी मंडळे, वारकरी, भक्त-भाविक मोठया संख्येने सहभागी झालेले होते.
बेलवडे हवेली येथे शिवलिलामृत ग्रंथ पारायण उत्साहात
RELATED ARTICLES