वाई : रस्त्यावर उन, वारा, पावसात हाल अपेष्ठा सोसत फिरणार्या बेघर मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांच्यावरउपचार करून माणूस म्हणून पुन्हा समाजात उभे करण्याचे पवित्र काम यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून रवींद्र बोडके व सौ. सोनाली बोडके करीत आहेत. त्यांचे हे कार्य समाजासाठी आदर्शवत आहे, समाजातील उपेक्षितांना यशोधन ट्रस्ट संचालित निवारा केंद्र हक्काचा आहे, असे प्रतिपादन वाई तालुक्याचे जननायक आ.मकरंद पाटील यांनी यशोधन ट्रस्टच्या वेळे(ता.वाई) येथील नवीन वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी बोलताना केले.
यशोधन ट्रस्टच्या माध्यमातूनसातारा येथे मनोरुग्णांवर उपचार करण्यात येतात. परंतु त्या ठिकाणी काही उपचार करण्यासाठी मर्यादा पडत असल्याने यशोधन ट्रस्टने वेळे ता. वाई येथे प्रशस्त जागेत चांगल्या पद्धतीने उपचार करता यावेत यासाठी नवीन वास्तूची उभारणी करण्याचा मानस असून त्या अनुषंगाने भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप बाबा पिसाळ, मदन भोसले, शशिकांत पवार, अशोकराव सरकाळे, सुरेशराव कोरडे, वामनराव जमदाडे, रफिक इनामदार, सुजित आंबेकर, अमिता आंबेकर, अनुश्री भिडे, डॉ.मयंक शेलार, डॉ.विजयाताई शेलार, काशिनाथ शेलार, विजय ढेकाणे, बाळासाहेब चव्हाण, प्रतापराव लोळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके, सोनाली बोडके त्यावर सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून सातारा जिल्ह्यातील सर्वच शहरात हि मोहीम राबवितात.शांत व मन प्रसन्न ठेवणार्या वेळे येथील जागेत हे उपेक्षितांसाठी हे हक्काचा निवारा केंद्र चालू करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना सहकार्य करावे असेही आमदार म्हणाले. यावेळी शशिकांत पवार, सुजित आंबेकर, सुरेश कोरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरुवातील आमदार मकरंद पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र बोडके यांनी केले तर आभार व सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी केले यावेळी वेळे परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील उपेक्षितांना यशोधन हक्काचा निवारा:आ. मकरंद पाटील
RELATED ARTICLES