सातारा : महाआघाडीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मंगळवारी (दि. 2) लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज विराट गर्दीच्या साक्षीने शक्तीप्रदर्शनाद्वारे वाजत गाजत भरला. आहेत. राजवाडा येथील गांधी मैदानावर सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार, मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. राजेंच्या प्रचारासाठी खुद्द आजितदादा पवार उपस्थित राहिल्याने राजे समर्थकांना सुखद धक्का बसला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. उदयनराजे भोसले यांना महाआघाडीचे उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी विराट रॅलीने जाऊन ते अर्ज दाखल केला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल तुतार्यांचा नाद व राजे समर्थकांच्या गर्दीने गांधी मैदान भरून गेले. यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले, नक्षत्रच्या अध्यक्षा सौ. दमयंतीराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. मोहनराव कदम, आ. आनंदराव पाटील, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सारंग पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक -निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, धैर्यशील कदम, सुनील माने, इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते, सुभाष जोशी, विजयराव कणसे, बाळासाहेब भिलारे, नितीन भरगुडे पाटील, सचिन नलवडे शंकरराव गोडसे, रिपाइं कवाडे व गवई गटाचे सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक तसेच मतदार संघातील गावोगावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, संचालक आदी मान्यवर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅलीस उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघात येणारे सर्व विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली आहेत. मतदारसंघातील प्रमुख शहरांमध्ये त्यांच्या प्रचारसभा सुरु असून त्यातून प्रचार केला जात आहे. खा. उदयनराजे मंगळवारी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे दोन तासाच्या राजकीय जल्लोषानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान उदयनराजे भोसले यांनी नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दाखल केले. यावेळी आ. अजितदादा पवार, आ. शिवेंद्र राजे भोसले, आ. शशिकांत शिंदे समवेत उपस्थित होते. तत्पूर्वी पोवई नाका येथे उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उघडया जीपमधूनच त्यांनी रॅलीतच समर्थकांना संबोधित केले. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, मी देशाचे हित पाहणारा नागरिक या नात्याने लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरत आहे. लोकशाहीचे हित समोर ठेवून लोकांच्या प्रगतीसाठी नेहमीप्रमाणे योगदान देणार आहे. लोकांच्या उपस्थितीत, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पाठबळावर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहे.
कराड संपर्क कार्यालयाचे वाजत गाजत उदघाटन
खा. उदयनराजे भोसले यांच्या कराड येथील मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी शिवसृष्टी संकुल, शनिवार पेठ दत्त चौक कराड येथे सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले .. यावेळी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आ. आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, हिंदुराव पाटील, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगरसेवक फारुख पटवेकर, मजहर कागदी, मच्छिंद्र सकटे, कराडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, मलकापुरचे नगराध्यक्ष सौ. निलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे तसेच कराड व मलकापुरचे सत्तारुढ आघाडीचे तसेच लोकशाही आघाडीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उदयनराजे अजितदादांची एकत्र रॅली
खा. उदयनराजे विराट रॅलीद्वारे अर्ज दाखल करत असताना राजेंच्या प्रचारासाठी मोती चौकात चक्क आमदार अजित दादा पवार या रॅलीत सामील झाले. तेव्हा राष्ट्रवादी समर्यकांनी एकच जल्लोष केला. अजितदादा व उदयनराजे यांचे विळ्या भोपळ्याचे नाते संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे . मात्र पक्षासाठी सगळे मतभेद बाजूला ठेऊन थोरल्या पवारांच्या आदेशाने राष्ट्रवादी एकसंघ सातार्यात उभी राहिली आहे. याची झलक उदयनराजे यांच्या रॅलीत पहायला मिळाली. या रॅलीस सकाळी 9 वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून प्रारंभ झाला. त्यानंतर ही रॅली वाजत -गाजत मोती चौक मार्ग पोवई नाक्यावर आली. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा शक्तीप्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल
RELATED ARTICLES

