सातारा : अत दीप भव या उक्तीप्रमाणे स्वतः/सामाजिक सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. सर्व स्तरात जातीय विषमता मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.तेव्हा जातीय व्यवस्था मुळापासून नष्ट केल्या पाहिजेत.तरच खर्या अर्थाने सामाजिक मुक्ती मिळेल.असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दल (राष्ट्रीय संघटक) मालोशी,ता.पाटण येथे बुध्दविहार उदघाटन संपन्न झाले.तेव्हा भारत पाटणकर उदघाटनपर मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे होते.यावेळी भंते दिंपंकरजी ,सौ.शलाका पाटणकर,बंधुत्व प्रतिष्टानचे संस्थापक अनिल वीर,तारळे विभागीय बौ.वि.से.संस्थेचे अध्यक्ष राहुल रोकडे आदी विविध स्तरातील मान्यवर मोठया संख्येनी उपस्थित होते
पाटणकर म्हणाले,महामानव डॉ.आंबेडकर व भ.बुद्ध यांचा मूर्तिपूजेस विरोध होता.त्यामुळे परिवर्तनवादी/वास्तववादी विचार करून मानवाने वाटचाल करावी.धम्माचा विस्तार करावयाचा असेल तर लोकांच्या भाषेतच मार्गदर्शन झाले पाहिजे.शिवाय, साहीत्यही त्या त्या भाषेत अनुवादीत झाले पाहिजे.तरच खर्या अर्थाने सामाजिक समता निर्माण होईल.भिक्कु ज्ञान देणारा असतो.तेव्हा चैत्यभूमीत असणारा, भिक्षू शब्द काढून भिक्कु असा दुरुस्त करावा.दुःखाचे निवारण स्वतःच करता येते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना मिलिंद कांबळे म्हणाले विचाराने धम्मबांधव म्हणून सामाजीक कार्य सकारात्मक केले पाहिजे.
गावातून मिरवणूक काढण्यात आली.पुष्यवृष्टीने मूर्तीची प्रतिष्ठापना भंते दिंपंकरजी यांच्या हस्ते करण्यात आली.तेव्हा ते म्हणाले,दुसर्या बरोबर प्रसन्न भावनेने कार्यरत राहिले तर स्वताचे दुःख लोप पावेल./नष्ट होईल.वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आनंदी रहा.
चंद्रकांत कांबळे,बाळासाहेब कांबळे व नितीन सावंत यांनी स्वागत केले.आनंद पवार यांनी आभारप्रदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट कार्यकर्ते मिलींद कांबळे(पाटण),विक्रांत कांबळे,गायकवाड, भंडारे,संदीप जाधव,पंचशील तरुण मित्र मंडळातील पदाधिकारी,कार्यकर्ते,ग्रामस्थ,उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जातीय-व्यवस्था नष्ट केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही : भारत पाटणकर
RELATED ARTICLES