म्हसवड ः धावत्या जगात आणि स्पर्धेच्या युगात व्यसन व फॅशनच्या मोहजाळ्यात अडकलेल्या समाजाला आता सतशास्त्र सतविचार, संतसंगतीची गरज असल्याने श्री वडजाईदेवी कृपाआशिर्वादाने पावन झालेल्या वडजल ता माण येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अक्षय तृतीयेच्या शुभमुर्हतावर 7 मे 14 या कालावधीत संपन्न होत आहे.
वडजल ता माण येथील ग्रामस्थ मंडळ,भजनी मंडळ व गणेश तरूण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 7 मे 14 या कलावधीत अखंड हरिनामा सप्ताह व श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा अक्षय तृतीयेच्या शुभमुहर्तावर आयोजित करण्यात आला आहे.
या पारायण सोहळ्याचा शुभारंभ श्री क्षेत्र कदमवाडीचे रमेशजी महाराज यांचे शुभहस्ते दुपारी 3 वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे.या व्यासपीठाचे चालक म्हणून ह.भ.प.मोतीराम महाराज गडदे,मार्गदर्शक-ह.भ.प.मनोहर महाराज काटकर सर,गायकवृंद ह.भ.प.शिवाजी चौधरी,बाळासाहेब गडदे, ज्ञानेश्वर चाटे, मृदगमणी पांडूरंग महाराज, सदाशिव केंगार, विणेकरी म्हणून यशवंत बापुराव काटकर आदिजन काम पाहणार आहेत.
तर मंगळवार 7रोजी ह.भ.प.मोतीराम महाराज गडदे, बुधवार 8रोजी ह.भ.प.शिवाजी महाराज चौधरी, गुरूवार 9रोजी ह.भ.प.मुक्ताई मुरलीधर ढेरे,शुक्रवार 10किसन महाराज शनिवार 11रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर चाटे,रविवार 12रोजी बाळकृष्ण जाधव, सोमवार13रोजी ह.भ.प.बळीराम शिंदे,मंगळवार 14रोजी बळीराम महाराज शिंदे या महाराजांची किर्तेने होणार आहेत. तर पारायण सोहळ्यात 11मे रोजी निकोप हॉस्पीटल फलटण यांच्या वतीने सकाळी 10ते 5या वेळेत मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सदर अखंड हरिणामा सप्ताह व श्री ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळ्याचा लाभ परिसरातील वारकरी संप्रदायातील लोकांनी घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ मौजे वडजल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वडजल येथे अखंड हरिणाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
RELATED ARTICLES

