साताराः बालेवाडी पुणे येथे झालेल्या राज्यस्तरिय निवड चाचणी मधुन के. एस. डी. शानभाग विद्यालयातील इयत्ता 10 वीची विद्याथिंनी श्वेता सतीश खामकर हिची शिखर राजस्थान येथे होणार्या 9 व्या हॉकी इंडिया सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही राष्ट्रीय स्पर्धा 15 मे ते 25 मे दरम्यान राजस्थान येथे होणार आहे.
श्वेता खामकर हिला शाळेचे हॉकी प्रशिक्षक सागर चंदक्रांत कारंडे,अनिकेत अडागळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे संस्थापक रमेश शानभाग, संचालिका सौ आँचल घोरपडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी व सर्व शिक्षक वर्ग यांनी तिचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
के.एस. डी. शानभाग विद्यालयाचे हॉकी स्पर्धेत यश
RELATED ARTICLES