फलटण: माढ्याचा गड जिंकल्यावर फलटणच्या सुपुत्राचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचेबरोबर आ.जयकुमार गोरे, मा.आ.दिलीप येळगावकर उपस्थित होते.
अतिशय अटीतटीच्या लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारीत फलटणचे नाव लोकसभेच्या माध्यमातून तब्बल 23 वर्षानंतर कोरल्यावर पहिल्यांदाच फलटण मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आल्यावर त्यांचे स्वागत क्रा. नाना पाटील चौकात गुलाल ढोल ताशांच्या गजरात जेसीबीमधून गुलाल उधळत उघड्या जीपमधून मोठी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी फलटणकर व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकसभेत आपले पिताश्री माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचे माध्यमातून 1996 साली जिंकला होता या नंतर तब्बल 23 वर्षांनी नव्याने (2009) साली स्थापन झालेल्या निवडणूकीत भाजपचे वतीने लोकसभा निवडणुकीत घसघशीत विजय मिळवला या मुळे पहिल्यांदाच आपल्या जन्मभूमीत आलेल्या सुपुत्राला शुभेच्छा देण्यासाठी अवघा युवक गोळा झाला होता. यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिगंबर आगवणे, अनुप शहा, जयकुमार शिंदे, सुशांत निंबाळकर, अशोकराव जाधव, राजेंद्र नागटीळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
माढ्याचा गड जिंकणार्या फलटणच्या सुपुत्राचे जंगी स्वागत
RELATED ARTICLES

