मसूर : शहापूर ता.कराड येथे कराड उत्तर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन मुल्ला यांच्या निवासस्थानी रमजान उपवासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी कराड-उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कराड-उत्तरचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, सातारा जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, सातारा जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शङ्गिकभाई शेख, कराडचे डिवायएसपी नवनाथ ढवळे, सह्याद्रि कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, भास्कर गोरे, महादेव वाघमारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की, इस्लाम धर्मामध्ये रमजान हा उपवास (रोजाचा) मानून लहान मुले व सर्व मुस्लीम बांधव सुर्योदयापूर्वीपासून सुर्यास्तापर्यंत पूर्णत: उपवास करून सर्वांचे हित साधने हे यातून नमूद करतात. हिंदू मुस्लीम ऐक्य आहे हे या इफ्तार पार्टीमुळे लक्षात येते असेच सर्व हिंदु मुस्लीम बांधवांमध्ये ऐक्य राहिल्यास सर्वांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल. याप्रसंगी कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, कराडचे डिवायएसपी नवनाथ ढवळे यांनी मनोगत व्यक्त करून, सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शङ्गिकभाई शेख म्हणाले की, आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्धपोटी काबाड कष्ट करणार्या लोेकांच्या परिस्थितीची जाणीव व्हावी, त्यातुन समाजातील सर्व गोरगरीब लोकांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी अल्लाहजवळ प्रार्थना करण्याचा हा प्रयत्न असतो. सदर कार्यक्रमास पालचे सरपंच जगन्नाथ पालकर, आप्पासाहेब खंडाईत, भिमराव जाधव, आस्लम सुतार, याकूब आगा, लतीङ्ग मुल्ला, जमीर मुल्ला, रहिम पटेल, ङ्गयाज मोमीन शौकत मोकाशी, कमाल मुजावर, चाँद पटेल, हमीद मुल्ला, युनूस मुल्ला, सिकंदर शेख, दादासाो जाधव, आण्णासाो कणसे, मोहन पवार, रामदास शेलार, दत्तात्रय शेलार, संदिप शेलार, अर्जुन उथळे, आनंदराव इंगवले, संभाजी थोरात, किसन डांगे, दस्तगिर मुल्ला, बाळासाो चव्हाण, विराज जाधव व हिंदु – मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमेश जाधव यांनी केले, सिकंदर शेख यांनी आभार मानले.
शहापूर येथे इफ्तार पार्टी उत्साहात
RELATED ARTICLES

