वाई : वाईच्या पश्चिम भागात कृष्णा नदीच्या पात्रात बेसुमारमातीचे उत्खनन चालू असून हजारो ब्रास माती कोणाचीही परवानगी न घेताच काढण्यात येत आहेत. कृष्णा नदीत गौण खनिजावर तालुक्यातील धनदांडग्यानी डल्ला मारला आहेच शिवाय पश्चिम भागातील स्थानिक ग्रामस्थांना दमदाटीचेप्रकार करून दहशत माजविण्याचा प्रकार चालू आहे, तरी त्वरित त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन श्री काळेश्वरी ट्रस्ट व रेनावळे व परिसरातील ग्रामस्थांनी वाईचे तहसीलदार-रणजीत भोसले, धोम पाटबंधारे, व वाई पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक -आनंदराव खोबरे यांना देण्यात आले आहे,
निवेदनात असेही म्हटले आहे, नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी दहा ते तीस फुटाचे खोल चर काढण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या खड्ड्यांमधून भविष्यात दुर्घटना घडून जीवित हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रशासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेताचअवैध रित्या बेसुमार उत्खनन करण्यात येत आहे. माती उत्खनन करून वाहतूक करणारे डंपर चालक गाड्यांना घासणे व लोकांच्या अंगावर गाडी घालण्या इतपत त्यांची मजल गेली आहे, त्यातून एकाद्याने जाब विचारल्यास वाईतून गुंड बोलावून त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. गाड्या आडव्या मारणार्या वाहनांवर तक्रार दाखल करण्यात आली तरीही पोलीस कसलीही चौकशी न करताच वाहने सोडून देतात, वाई पोलीस सुध्दा कारवाईचा दिखावा करीत असल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थ करीत आहेत. तरी हे त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे, तसेच माती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा आंदोलन करून उध्वस्त करण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल, त्याचप्रमाणे वेळेतच या धन दांडग्याना प्रशासनाने रोखले नाही तर या भागाच्या वतीने जनआंदोलन श्री, काळेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. श्री, काळेश्वरी ट्रस्टच्या सदस्यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून धोम धरण क्षेत्रात चालू असलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली असता तहसील विभागाच्या वतीने कोणतीही परवानगी दिली नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले, तसेच या धनदांडग्यानी धोम पाटबंधारे खात्याची सुध्दा परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. पश्चिम भागातील आसरे, रेनावळे, खावली, व वडवली या गावातील नदी क्षेत्रातील माती जेसीपीच्या सहाय्याने भरमसाठ माती उत्खनन होत आहे. दररोज किमान 100 ते 150 डंपरची वाहतूक होत आहे. त्या डंपरवर गाडीचा नंबर टाकलेला नसतो, हा एक प्रकारचा गुन्हा असून संबंधितांवर कडक कारवाई करावी. धरण पात्रात दहा ते पंधरा फुटाचे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्यात अशा ठिकाणी नेहमीच अपघात होतात, धरणात बुडून दुर्घटना किती होण्याचे संबंधित खाते वाट पाहत आहे. असा प्रश्न या निमित्ताने उपस्तीत केला जात आहे. या भागातील लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असून त्यावर प्रशासनाने गांभीर्याने घेवून त्वरित उपाय काढावा अन्यथा श्री, काळेश्वरी ट्रस्ट व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा निवेदनातून ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष- ज्ञानदेव शेठ सणस, ग्रामस्थ यांनी दिला आहे.निवेदनावर ट्रस्टच्या सदस्यांच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
धोम जलाशयात बेसुमार मातीचे उत्खनन; ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
RELATED ARTICLES

