कोरेगाव : संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार क्षेत्रात आपली विशिष्ठ ओळख निर्माण करणार्या कामगार नेते विठ्ठलराव गोळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे विधीमंडळातील मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते गोळे यांना त्यांच्या वाढदिवसादिवशीच हे पत्र प्रदान करण्यात आले.
खर्शी-बारामुरे (करहर), ता. जावली येथील रहिवासी असलेले व आ. शशिकांत शिंदे संस्थापक-अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्य जनरल कामगार युनियनचे ते सरचिटणीस आहेत. त्यांनी आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युनियनचा राज्यभरात मोठ्याप्रमाणावर विस्तार केला आहे. ग्रामीण भागातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी ते अहोरात्र कष्ट घेतात. कामगारांच्या हितासाठी ही युनियन सदैव कार्यरत असून, गोळे यांनी युनियनचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजसदादा शिंदे यांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्यात युनियनद्वारे वेतन करार करुन कामगारांना न्याय मिळवून दिला आहे.
कामगार क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक -अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजी खटकाळे यांनी विठ्ठलराव गोळे यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नियुक्ती पत्र प्रदान केल्यानंतर युनियन व कामगार सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
कामगारांच्या न्यायहक्कासाठी कटीबध्द : गोळे
विठ्ठलराव गोळे यांनी आपल्या नियुक्तीबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचे आभार मानले आहे. आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कामगार युनियन क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचे निकटवर्तीय व निष्ठावंत पदाधिकारी म्हणून आज संपूर्ण राज्यात ओळखले जाते, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून आ. शिंदे यांनी पक्षाच्या कामगार सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून, एक आगळी-वेगळी भेट दिली आहे. कामगारांच्या न्यायहक्कासाठी सदैव कटीबध्द राहणार आहे, असे गोळे यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी विठ्ठलराव गोळे
RELATED ARTICLES

