Wednesday, December 3, 2025
Homeताज्या घडामोडीम्हसवड बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट, प्रवाशी वर्गाला त्रास

म्हसवड बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट, प्रवाशी वर्गाला त्रास

म्हसवड ः म्हसवड येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम येत्या दिवसात सुरू न झाल्यास तसेच सातारा-लातूर व म्हसवड – माळशिरस या रस्त्यांची कामे गतीने पूर्ण न केल्यास तसेच या रस्त्याच्या कामामुळे झालेल्या अपघातास संबंधितांस जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई न केल्यास 17 जून पासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे प्रवाशी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपट बनसोडे यांनी दिला आहे
म्हसवड हे माण तालुक्यातील महत्वाचे व सर्वात मोठी बाजारपेठ असलेले मोठे शहर आहे.तसेच आसपासच्या सुमारे पन्नास गावातील शिवाय इतर वाड्या-वस्त्या यांचा संपर्करोज या शहराशी येत असतो.विशेष म्हणजे सन 1857 सालची नगरपरिषद याठिकाणी आहे.याशिवाय विविध राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव मार्गशीर्ष महिन्यात असतो.यावेळी लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावत असतात.शिवाय प्रत्येक रविवार,पौर्णिमा,आमावस्या या दिवशी शेकडो भाविक श्रींच्या दर्शनासाठी नित्यनियमाने येथे आवर्जून हजेरी लावतात.त्यामुळे कायमपणे गर्दीने गजबजलेले येथील बसस्थानक असते.येथून दिवसभरात किमान 70 एस टी बसेस ये-जा करतात अर्थात एस.टी महामंडळाला तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे हे एकमेव बसस्थानक आहे.
त्यामुळे सर्व सोई-सुविधांनी परिपूर्ण असे अत्याधुनिक नवीन बसस्थानकाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.मात्र मागील सहा महिन्यापूर्वी येथील जुने बसस्थानक पाडून नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.पिलर उभारण्यासाठी खड्डे काढण्याचे काम सुरू होते मात्र धर लागत नाही,बजेट वाढणार या सबबीखाली संबंधित ठेकेदार हे काम सोडून अचानक गायब झाला.त्यामुळे
सध्या म्हसवड बसस्थानकाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून प्रवाशी वर्गाला याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ना घर का,ना घाट का अशी अवस्था येथील प्रवाशी वर्गाची झाली आहे.जुने बांधकाम पाडल्याने सर्वत्र माती असल्याने मोठ्या प्रमाणात असलेल्या धुळीच्या साम्राज्यामुळे महिला,विद्यार्थी,आजारी व्यक्ती यांना त्रास होत आहे.यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झालेला आहे बसस्थानक परिसरात कुठेही सावली नसल्याने बसस्थानकात कडकडीत उन्हात उभे राहणे म्हणजे एक प्रकारची शिक्षा झाली आहे.त्यामुळे प्रवाशांचे हित लक्षात घेता येथील नवीन बसस्थानक इमारत लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याने नवीन बांधकाम तातडीने म्हणजे आठ दिवसाच्या आत सुरू करावे .
सातारा – लातूर महामार्गाचे रंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गत दोन वर्षापासून सुरु असून या कामाकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम संथगतीने सुरु आहे.हे काम गतीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
सातारा – लातूर महामार्गाचे रंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गत दोन वर्षापासून सुरु असून या कामाकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम संथगतीने सुरु असून पंढरपूर ते म्हसवड हा रस्ता पूर्ण होत आला तरी म्हसवड सातारा ह्या भागाकडील रस्त्याचे काम संतगतीने सुरु असून हे काम कधी पूर्ण होणार ? संबंधित यंत्रणा डोळे मिटून का पाहत आहेत, वाहनधारकांना या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामातुनच जीव मुठीत धरुन वाहने चालवत प्रवास करावा लागतो तरी जलद गतीने हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी वाहनधारकांतुन केली जात आहे. या रस्त्याचे काम गत दोन वर्षा पासून सुरु असून जुना डांबरी रस्ता पूर्ण पणे उखडून टाकुन ठीक ठिकाणी मुरुम टाकला आहे या कच्च्या रस्त्यावर कुठे ही पाणी न मारल्याने वाहणांच्या वर्दळीमुळे सततची धुळ उडत असून असंख्य खड्ड्यामुळे अनेक दुचाकी चालक व वाहनधारकांना अनेक शारिरीक व्याधी झाल्या असुन श्वसनाचे आजार जडले आहेत.तर अनेक छोटे मोठे आपघात घडले असून अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. या मार्गावर गोंदवले खुर्द मध्ये जनार्धन पोळ वस्ती नजीक काम रखडले असून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉली मुळे रस्ता मोठ्या प्रमाणात आरला असून यात मोठ-मोठे खड्डे पडले त्यामुळे अवजड वाहतुकीला मोठा त्रास होत असून दुचाकीधारकांच्या गाड्या या खड्ड्यामुळे घसरून पडत आहेत. म्हसवड येथून दहिवडीकडे जाणार्‍या रस्त्यावर पवारवस्ती पाटीवर तर रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराने एकाबाजुचा रस्ता तीन महिन्यांपासून एक साईडचा सुमारे पाच फूट एक साईड खोदून ठेवला आहे तसेच पिंगळी खुर्द येते सुरू असलेल्या काम जवळ खडीचे ढीग टाकले असून तिथे कोणताही दिशा दर्शक फलक लावला नाही.तर अनेक नवीन रस्त्याचे काम झाले असून तिथे ही खडीचे ढीग अचानक टाकले जात असून वळण आहे किंवा या ठिकाणा वरून हळूने प्रवास करा असे फलक लावण्यात आले नसल्याने याठिकाणी रात्रीच्या वेळेस एखादा मोठा आपघात घडण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी रस्त्याची एक लेन झाली आहे त्या ठिकाणी पण रस्ता भरून घेण्यासाठी टाकलेली माती पूर्णतः रस्त्यावर पसरत असून धुळीमुळे वाहनचालकाला पुढचा रस्ता दिसत नाही तरी वेळीच हा रस्ता पूर्ण करुन वाहनधारकांना दिलासा द्यावा
अन्यथा येत्या 17 जून पासून आमरण उपोषण करणार असल्याचे प्रवाशी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपट बनसोडे यांनी निवेदनादव्वारे इशारा दिला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular