फलटण : नीरा देवधर च्या पाणी प्रश्नावर विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व सातारचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यातील टिकेने वेगळे वळण घेतले असून सातारा येथे राजे प्रतिष्टानच्या कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने फलटण येथे या घटनेचा निषेध करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल मोर्चा काढीत या घटनेचा निषेध करीत संपूर्ण फलटण शहर बंद केले या वेळी संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते तथापि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस निरीक्षक धीरज पाटील यांनी शहरात येऊन घटनेची माहिती घेत सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला व श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास या निवासस्थानी ही पोलीस संरक्षण देत समोरील गेट बंद ठेवत सुरक्षारक्षक नेमले.
नीरा देवधरच्या पाणी प्रश्नावरून बारामती व इंदापूरला पाणी देण्यासाठी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता या नंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पिसाळलेल्या कुत्र्याची टीका केल्याने राजघराण्याचा अपमान केला आहे असा आरोप करत राजे प्रतिष्ठाण ने सातारा येथे आज शनिवारी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळल्याने या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी निषेधाच्या घोषणा देत संपूर्ण फलटण शहर बंद ठेवले, यामुळे फलटण मध्ये मोठा तणाव निर्माण झाला पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यां नेतृत्वाखाली फलटण शहरातून मोटार सायकल रैली काढण्यात आली.
शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून श्रीमंत रामराजे यांच्या विजय असो च्या घोषणा देण्यात आल्या तसेच श्रीमंत रामराजे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याने जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेच्या विरोधात घोषणाबाजी करून दुपारी फलटण बंदचे आवाहन केले बंदला फलटणकर नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असून संपूर्ण शहर बंद करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस प्रमुख धीरज पाटील यांनी फलटण मध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक युद्धामुळे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलह निर्माण झाला आहे.
रामराजेंचा पुतळा सातार्यात जाळल्याने फलटण कडकडीत बंद
RELATED ARTICLES

