Wednesday, November 5, 2025
Homeताज्या घडामोडीपाऊस आला धावून रस्ते गेले वाहून, पाटेघर-रोहोट रस्ता गेला खड्ड्यात

पाऊस आला धावून रस्ते गेले वाहून, पाटेघर-रोहोट रस्ता गेला खड्ड्यात

परळी ः परळी खोर्‍यातील धरणांच्या बाजूला असलेला आंबवडे रोहोत वेने खोल हा रस्ता पावसाच्या सुरुवातीत खड्डेमय अन् जलमय झाला आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पाणी साचल्याने वाहनधारकांचे अन् वाहनांचेही कंबरडे मोडत आहे.
अंबवडे गावातून पुढे गेल्यावर आंबवडे पुनवडी आरगडवाडी दहिवड लुमनेखोल, वडगाव, कुरूळ, सावली या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांची मोठी कसरत होता रस्त्याबरोबरच साईडपट्टया खचल्याने वाहन चालवताना अपघात होत आहेत.
खड्डयांचा विषय रस्त्यांइतकाच जुना. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या म्हणजे एसटीची एक लोकप्रिय टॅगलाईन होती, रस्ता तिथे एसटीफ त्यात थोडा बदल करून जिथे रस्ता तिथे खड्डेफ असं म्हटलं तर जिह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची आजची अवस्था पाहता स्पष्ट होईल. नेहमीच येतो पावसाळा अन् सोबतीला खड्डेफ अशी स्थिती जिल्हाभर उद्भवली आहे. जिह्याच्या पश्चिमेकडे दमदार पाऊसाची हजेरी लागल्याने रस्त्यांतही खड्डयांची संख्या वाढली आहे. खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अपघातही वाढले आहे. तरी संबंधितांनी एकदा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.
आंबवडे रोहोट पाटेघर सायळी लूमनेखोल या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. येथील रस्त्यांची दुरुस्ती गेले चार वर्षांपासून झालेली नसल्यामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. मात्र रस्त्यांवरील खड्डयांचा त्रासदायक अनुभवही वाहनधारक, प्रवाशांना घ्यावा लागत आहे. खड्डयांमध्ये पावसाचे खडूळ पाणी साचून राहत असल्याने वाहनधारकांना खड्डा असल्याचे लवकर समजत नाही. त्यामुळेच अपघातांना एकप्रकारे आमंत्रणच दिले जात आहे. तरी संबंधित विभागाने लवकरात लवकर खड्डे भरून काढावे अशी मागणी होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular