सातारा : नेतृत्त्व घडविणारे शिक्षण ही काळाची गरज असून हिंदवी त्यात अग्रेसरपणे कार्यरत असल्याचे प्रतिपादन हिंदवी पब्लिक स्कूलचे संस्थ्पाप क अध्यक्ष व प्राचार्य अमित कुलकर्णी यांनी केले. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटी संचलित हिंदवी पब्लिक स्कूलच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव नानासाहेब कुलकर्णी, खजिनदार सौ. अश्विनी कुलकर्णी, संस्थेचे उपाध्यक्ष देवदत्त देसाई, संचालक राहुल बंदरकर, उपप्राचार्य अभिजित कुलकर्णी व डॉ. अमोल बरीदे, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. कुलकर्णी म्हणाले, गेली 16 वर्षे अनेक कठीण प्रसंगातून शाळा उभी राहिली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या स्वयमेव मृगेंद्रता, या सिद्धांतानुसार गुणवत्तेत तडजोड न करता, समाजाला नेतृत्व देणारी पिढी घडविण्याचे काम सुरू आहे. भाषा, विज्ञान,गणित,याबरोबरच अनोपचारिक शिक्षणाच्या वाटा शोधण्याचे महत्त्वाचे काम हिंदवी ने हाती घेतले आहे. आज 16 वर्षानतर एक वेगळा शिक्षण प्रयोग सातार्यात आकाराला आला आहे. यासाठी सातारकर पालक, शिक्षक, शिक्षकेतर सहकार्याचे तितकेच मोलाचे योगदान लाभले आहे.
रविवार असून मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. सरस्वती पूजन, काही हस्तकला उपक्रमांमुळे मुलांनी शाळेचा पहिला दिवस आनंदायी वातावरणात अनुभवला. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाई यांचे शिल्प, देवघरात ठेवण्यात आलेली श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, डिक्शनरी, ही ग्रंथसंपदा आणि या सार्याकडे कुतुहलाने बघणारे विद्यार्थी,असे चित्र आज पाहायला मिळाले.
वर्धापनदिनाच्या निमित्ताने सरस्वतीपूजन व खाऊ वाटप झाले. पालक व हिंदवी परिवारावर प्रेम करणारे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी साक्षी घनवट हिने केले, तर आभार अंजली शिंदेने मानले.
नेतृत्त्व घडविणारे शिक्षण ही काळाची गरज असून हिंदवी त्यात अग्रेसरपणे कार्यरतः प्राचार्य अमित कुलकर्णी
RELATED ARTICLES

