साताराः येथील श्यामसुंदरी रिलीजीएस अॅन्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या केएसडी शानभाग विद्यालय व कॉलेजचा यावर्षीचा शालांत व उच्च शालांत परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
मार्च 2019 मध्ये संपन्न झालेल्या इ.10 वी व 12 वीच्या परिक्षेत मुलामुलींनी उज्वल यश संपादन केले आहे. इ.10 वीच्या नुकत्याच जाहिर झालेल्या निकालामध्ये शाळेच्या सहा विद्यार्थ्यानी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवले आहेत. 40 विद्यार्थी विशेष प्राविण्य गटात, 31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 8 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 1 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाला आहे. विद्यालयात 40 टक्के गुण मिळवून फुटबॉल खेळाडू भूषण नरेंद्र पिसाळ हा विद्यार्थी प्रथम आला आहे.91.60 टक्के गुण मिळवून फुटबॉल खेळाडू वैष्णवी अनिल सावंत द्वितीय आली आहे.91.20 टक्के गुण मिळवून बास्केटबॉल खेळाडू साक्षी सतिश शिंगटे ही तिसरी आली आहे. शाळेची सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळविलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू म्हणून पुरस्कार मिळवलेल्या कु.चैतन्या संजय राजे हिने 90.60 टक्के गुण मिळवून शाळेत चौथा क्रमांक मिळवला आहे तर क्रिकेट खेळाडू विराज संजय सावंत याने 90.20 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे. शाळेची कु.आर्या प्रमोद मोरे जी बास्केटबॉल खेळात राष्ट्रीय खेळाडू म्हणून चमकत आहे हिने 59.60 टकके गुण मिळवून विद्यालयात सहावा क्रमांक मिळवला आहे.
विद्यालयाच्या नवीन शैक्षणिक वर्षास सुरवात झाली असून ज्युनिअर कॉलेजच्या आर्ट व कॉमर्स विभागासाठी प्रवेश प्रक्रीयेला सुरवात झाली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थीनीचे अभिनंदन शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ. उषा शानभाग, अॅड.विलास आंबेकर, संचालिका सौ. आंचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, मुख्याध्यापक प्रथमिक विभाग भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिधिी, शिक्षीका तसेच कार्यालयीन कर्मचार्यांनी करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
केएसडी शानभाग विद्यालयाचा 10 वी व 12 वी चा निकाल 100 टक्के
RELATED ARTICLES

