फलटण: दि. 5 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत वर्षा बंगला येथे नीरा देवधर च्या पाणी प्रश्नासंदर्भात बैठक संपन्न झाली.
यावेळी फलटण तालुक्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी देऊन तालुक्यातील शेतकर्यांना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शब्द पूर्ण केला. नीरा देवधर धरणातील पाणी गावडेवाडी ता.खंडाळा येथून लिफ्ट करून धोम बलकवडी कॅनॉल मध्ये सोडून आदर्की ते आंदरुड या पट्ट्यातील शेतकर्यांना 8 महिने पाणी देणेबाबत प्रयत्न चालू ठेवले होते.
तेे खर्या अर्थाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आदेश देऊन ती योजना पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन दिले याबाबतचे आदेश काढण्याचे संबंधित विभागास सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे या भागातील शेतकर्यांना 4 महिने मिळणारे पाणी आता 8 महिने होणार असून हा संपूर्ण दुष्काळी पट्टा खर्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच निरा देवघर धरणातील उजव्या कालव्यात पाणी वाढल्याने निरादेवघरचे कालवे पुर्ण होईपर्यंत लाभक्षेत्रातील शेतकर्यांना लिफ्टच्या परवानग्या 8 दिवसांत देणेबाबत सुचना मंत्री महोदयांनी दिले.
त्यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे, तसेच आज नीरा देवधरचे कालवे पुर्ण करणे बाबत मुख्यमंत्र्यांनी या गावातील शेतकर्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका घेतली आहे यासाठी बळीराजा योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे तसेच नीरा उजवा कालव्यातून मिळणारे पाणी धरणांमध्ये बाष्पीभवन होऊन शिल्लक राहणारे व सूक्ष्म सिंचन योजनेतून शिल्लक राहणारे पाणी हे उजव्या कालव्यातून सांगोला तालुका पंढरपूर तालुका तिल शेतकर्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील तिन्ही योजना मुख्यमंत्री यांच्याकडे मंजूर करून घेऊन एकाच दगडांमधील तीन पक्षी मारले असे म्हटले तर वावगे होणार नाही याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये माण तालुक्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आमदार जयकुमार गोरे यांचा प्रश्न असणारा आणि त्यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिहे कटापूर व टेंभू योजना 64 गावांसाठी आसणारी योजना आपण पूर्णत्वास न्हावी याबाबतची भूमिका घेवुन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठींबा दिला होता तोही प्रश्न आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मार्गी लागून याही दुष्काळी तालुक्याची प्रश्न आज मार्गी लागले, नीरा देवधर टेंभू आणि जिहे कटापूर योजना मार्गी लावण्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्यंत मोठे योगदान या दुष्काळी तालुक्यातल्या न्याय देऊन भारतीय जनता पक्ष दुष्काळी तालुक्यातल्या जनतेशी पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवून दिले आहे या योजनेमुळे कायमस्वरूपी दुष्काळी भागाचा कलंक पुसून जाईल या भागातील शेतकरी खर्या अर्थाने समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
नीरा देवधर च्या पाणी प्रश्नी फलटणकरांसाठी आनंदाची बातमी
RELATED ARTICLES

