सातारा: (एकनाथ थोरात) सातारा शहरात वाहतुकीसंदर्भात येणार्या अडचणीवर मात करण्यासाठी वाहतुकदार, व्यावसायिक यांच्यात सकारात्मक बैठक होवून या बैठकीत वाहतुकीबाबत कठोर निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी बाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.
सातारा शहरातील वाहतुक नियमनासंदर्भात सोमवारी अप्पर पोलिस अधिक्षक धीरज पाटील, आ. शिवेंद्रराजे भोसले, वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा व विविध संघटनांचे प्रतिनिधी, सभासद यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत वाहतुकीबाबत चर्चा होवून सकारात्मक निर्णय झाले. यामध्ये दुपारी 12 ते सायंकाळी 4 व रात्री 8 नंतर सर्व प्रकारचे वाहनातून मात्र चढउतार करणेस परवानगी देण्यात आली. राधिका रस्त्यावर ट्रक पार्कींग करण्यास मान्यता देणेत आली. तसेच शहरातील एकेरी वाहतूक, दुहेरी पार्कींग व्यवस्था, पार्कींग झोन निर्माण करणे, सकाळी 10 पर्यंत माल चढउतार करणे, हॉकर झोन बनविणे, वाहतुकीस शिस्त लावणेचे दृष्टीने पट्टे, झेब्रा, क्रॉसिंग, स्वच्छविना अडथळा फुटपाथ, सिग्नल, अतिक्रमण आदी विषयावर नगरपालिका प्रशासन, वाहतुकदार व व्यावसायिक यांची संयुक्त बैठक येत्या आठ दिवसात स्वत: अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील आयोजित करणार आहेत. बैठकीत सकारात्मक निर्णय करुन देण्याचे आश्वासन कदम, राजू कासट, धनंजय कुलकर्णी, अजित शहा, विजय येवले, अशोक बादापुरे व शेकडो व्यापारी उपस्थित होते.
व्यावसायिक व वाहतुकदार यांच्या सूचना
ग्रेड सेप्रेटरचे काम पूर्ण होईपर्यंत नवीन कोणतेही नियम सुरु करु नयेत, राजपथ वरील रस्ता येथे सकाळी 10 ते 12 व सायं. 4 ते 8 या वेळेत फक्त गर्दी असते त्यामुळे एकेरी वाहतुकीची आवश्यकता वाटत नाही. जर आपण एकेरी वाहतूक सुरु ठेवणारच असाल तर शाहूु चौक ते मोती चौक रस्त्याचे दोन्ही बाजूस पार्कींग झोन बनविणे, वाहतुकीस अडथळा निर्माण केलेली अतिक्रमणे तातडीने दूर करणे, त्यायोगे पादचारी व्यावसायिक व वाहनधारक यांना सुरळीतपणाने नियमास अनुसरुन कामकाज करता येईल. ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेणे जरुरी आहे. सातारा शहरात विविध ठिकाणी पार्कींग झोन, हॉकर झोन, रस्त्यावर पार्कींग पट्टे, क्रॉसिंग, स्वच्छ विना अडथळा फूटपाथ, सिग्नल इ. आवश्यक त्यासव; नागरी सुविधा मिळे आवश्यक आहे. आवश्यक सुविधा दिल्याशिवाय नियमांची अंमलबजावणी करु नये.
शहर वाहतुक बैठकीत घेतले सकारात्मक निर्णय
RELATED ARTICLES

