आ. बच्चू कडू यांचा फलटण येथे पत्रकारांशी संवाद
फलटण – पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने हे आमदार खासदार यांचे असल्याने त्यांना ऊस उत्पादक शेतकर्यांना दर देण्यासाठी सरकार दबाव आणीत नाही त्यामुळे शेतकर्यांचे कैवारी असल्याचा आव आणून प्रत्येक वर्षी उसाच्या दरासाठी आंदोलने उभारली जातात मात्र त्यातून शेतकर्यांना काहीच फायदा होत नाही त्या मुळे तात्पुरती लढाई लढण्यापेक्षा आता आरपारची लढाई करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकर्यांनी तयार राहावे असे आवाहन प्रहार संघटनेचे नेते आ.बच्चू कडू यांनी केले ते फलटण तालुक्यातील प्रहार संघटनेच्या वतीने काढण्यात येणार्या संवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी फलटण येथे विश्रामगृह येथे आले तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
या वेळी बोलताना म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रात आज साखर कारखाने हे आमदार, खासदार यांचे आहेत या मुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या कारखानदारांनी शेतकर्यांना कितीही लुटले तरी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत असा आरोप केला,केंद्र सरकारने स्वच्छता अभियान राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली या मध्ये फक्त नौटंकी केली आहे,मात्र शेतकर्यांना कोणतीही मदत केली नाही, या मुळे आज सर्वसंपन्न महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी या कारखानदार यांची स्वच्छता करावी अशी मागणी केली, या वेळी बोलताना कडू यांनी सांगितले की मी कडू आहे या पुढे माझी लढाई या गोड साखरेशी असणार आहे या मुळे कारखाना व त्यांना मिळणारा फायदा याची माहिती देण्यासाठी शेतकर्यांची कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे,या मुळे केंद्र सरकारने सांगितले आहे की दीड पट हमीभाव देऊ मग आमच्या ऊस उत्पादक शेतकर्यांना 3700 रुपये भाव द्या अशी मागणी केली आहे व हा भाव देऊन बघा किती बदल होईल ते फक्त फोटो पुरते स्वच्छता अभियान राबविण्यासाठी अनेक जण पुढे येतात या वेळी त्यांनी अमीर खान व नाना पाटेकर यांचेवर शेलक्या भाषेत टीका करताना सांगितले की तुम्हाला मदत करायची आहे तर शेतकर्यांना करा असे सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी आजपर्यंत निराधार, अपंग,विधवांचे प्रश्न घेऊन अनेक आंदोलने केली मात्र आजपर्यंत अपंग लोकांना राज्य सरकार व केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नसल्याने विविध मागण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट ला दिल्ली येथे आंदोलन करणार आहे, आजपर्यंत सरकारने 80%ते100%अपंग असणार्याला फक्त 200/300 रुपये मदत होत आहे मात्र त्यांना भरीव मदत करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही असे सांगितले, अंध व अपंग लोकांना आज 70 वर्षे झाली देश स्वतंत्र होऊन मात्र त्यांना वेगळा अभ्यासक्रम नाही, त्यांचे स्वतंत्र विद्यापीठ नाही मग कसले स्वतंत्र मिळाले असा प्रश्न आ.कडू यांनी विचारला,कोणत्याही सरकारने साधे संशोधन ही केले नाही या मुळे राज्य व केंद्र सरकार अपंगांना दुजाभाव देत असल्याचा आरोप आ.कडू यांनी केला आहे.
यामुळे अपंगांना न्याय मिळवून देण्यासाठी या पुढे आंदोलने केली जाणार असून या पुढे आरपारची लढाई लढण्याचा निर्धार आ.बच्चू कडू यांनी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही लढाई करण्याचे आवाहन केले, राजकारणात आमदार, खासदार यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाते व त्यांच्या बाबत भावनिक आवाहन केले जाते मग एखाद्या शेतकर्याने आत्महत्या केली तर मग त्या शेतकर्याच्या पत्नीला उमेदवारी आम्ही दिली मात्र फक्त वीस हजार मते मिळाली म्हणून या पुढे अजून युती,आघाडी करायची का नाही ते अजून ठरले नाही मात्र कमीतकमी पाच आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून येणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या बरोबर चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी स्पष्ट केले या वेळी सातारा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शंभूराज खलाटे व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
उसाच्या दरासाठी तात्पुरती लढाई लढण्यापेक्षा आता आरपारची लढाई
RELATED ARTICLES

