मेढा : शिक्षक संघाच्या वतीने राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवून घेणेसाठी मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री ना.आशिष शेलार यांचे उपस्थितीत सातारा येथे घेण्यात येर्णाया शिक्षण परिषदेस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मेढा येथे आयोजीत केलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात सांगितले.
ते पुढे म्हणाले, विरोधकांची वैचारीक लढाई संपली की त्यांचे अस्तीत्व धोक्यात येते व वैयक्तीक भ्याड हल्ले होतात. त्यामुळे शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांनी याकडे अधिक लक्ष न देता संघर्षातून मिळालेला विजय निश्चितच ऐतिहासिक असतो. या सर्व प्रक्रियेत आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या पठीशी खंबीरपणे उभे रहाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके म्हणाले, माझ्या आयुष्यात शिक्षकांच्या प्रश्नासाठी अखंडपणे काम करीत असून प्रामाणिकपणे शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा मी नेहमीच पारदर्शक प्रयत्न केलेला आहे. यावेळी त्यांनी भ्याड हल्ल्यांना भिक न घालणारा मी कार्यकर्ता असून असे कितीही हल्ले झाले तरीही अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहीन. यापुढेही या अपप्रवृत्तींना जशास तसे उत्तर दिले जाईल. आगामी काळात शिक्षकांच्या प्रश्नासाठी राज्यस्तरीय लाखो शिक्षकांची शैक्षणिक परिषद सातारा येथे आयोजीत केली जाईल असे स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी शिक्षक संघाच्या पाठीशी जावली तालुका नेहमीच खंबीरपणे उभा असून ही परंपरा कायम राखावी असे आवाहन केले व नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सागर पवार यांचे शैक्षणिक व्याख्यान झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे,मच्छिंद्र मुळीक, जिल्हा नेते सुरेश गायकवाड, मिलन मुळे,बळवंत पाडळे, योगिता मापरी यांची भाषणे झाली.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक, आदर्श शाळा यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. यावेळी जावली तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्षपदी सुरेश जेधे, सरचिटणीस अशोक लकडे, कार्याध्यक्ष संतोष कदम,कोषाध्यक्ष रामचंद्र भिलारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष रघुनाथ दळवी यांनी प्रास्ताविक केले तर अशोक लकडे यांनी सुत्रसंचालन केले व शंकर जांभळे यांनी आभार मानले. अधिवेशनास जिल्हयातील व जावली तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक,शिक्षीका,आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांना विधान परिषदेवर पाठवा :
सुरेश गायकवाड ,अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष व राज्यातील शिक्षकांचे लोकप्रिय, धडाडीचे नेते श्री.सिद्धेश्वर पुस्तके यांना शिक्षक आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवावे यासाठी आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घ्यावा अशी जोरदार मागणी जिल्हा नेते सुरेश गायकवाड यांनी आपल्या भाषणामध्ये केली. त्यांच्या या मागणीचे उपस्थित शिक्षकांनी जोरदार टाळयांच्या गजरात समर्थन केले.
राज्यव्यापी शिक्षण परिषदेला सर्वतोपरी सहकार्य करणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले
RELATED ARTICLES

