वाई: रोटरी क्लब ऑफ वाईतर्फे सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या तीरावर असलेले महापुरमध्ये प्रचंड नुकसान झालेल्या शिगांव (ता.वळवा, जि.सांगली) या गावी प्रत्यक्ष महापुरामध्ये नुकसान झालेल्या कुटुंबाची भेट घेऊन दिड लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचे एक ट्रक भरून अत्यावश्यक वस्तूचे वाटप रोटरी क्लब वाईतर्फे करण्यात आले. हे काम करत असताना तेथील परिस्थिती पाहून डोळ्यात अश्रू आले.
350 बेघर झालेल्या कुटुंबांना ब्लँकेटस, चादर, टूथब्रश, पेस्ट, तेल बॉटल, सॅनिटरी नॅपकिन, महिलांचे, पुरुषांचे नवीन कपडे, बिस्किट्स, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, डाळी इत्यादी साहित्य दिले.
यावेळी त्या गावातील ग्रामस्थ अविनाश चव्हाण, रोटरीयन प्रमोद शिंदे, दीपक बागडे, डॉ. नितीन कदम व बाळासाहेब सोळंकुरे पाटील आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. हे साहित्य जमा करण्यासाठी स्वाती हेरकळ, मनीषा पोरे, अश्विनी बागडे, अजित पवार यांची खूपपरिश्रम घेतले.
तसेच रोटरी क्लब पाटणच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ वाईने तीनशे लहान मुलांना, महिला, पुरुष यांच्यासाठी थंडीचे कपडे दिले. हे काम करत असताना रोटरी क्लब वाई चे सर्व सदस्यांची खूप मदत झाली.
वाई रोटरी क्लबच्यावतीने पूरग्रस्तांना मदत
RELATED ARTICLES

