भुईंज : देशभक्त आबासाहेब वीरांनी केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर ध्येयाने प्रेरीत होवून समाजासाठी कसे झिजायचे याचा आदर्श घालून दिला. स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी येरवडा तुरुंग फोडून केलेला पराक्रम स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदलाच याशिवाय त्यांनी आयुष्यभर केलेले काम आपल्यासाठी सदैव प्रेरणा देत आहे, असे प्रतिपादन किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी किसनवीरनगर (ता. वाई) येथे बोलताना केले.
किसन वीर कारखान्याचे संस्थापक स्व. किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त किसन वीर परिवारातर्फे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.
मदन भोसले पुढे म्हणाले, आबासाहेब वीर यांच्या सारख्या पहाडासारख्या व्यक्तिचे संस्कार लाभले, फार जवळून सहवास लाभला यासोबतच त्यांनी उभ्या केलेल्या कामाला पुढे नेण्याची जबाबदारी खांद्यावर घेता आली, ही माझ्यासाठी सर्वात मोठी शिदोरी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संचालक चंद्रकांत इंगवले, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, प्रकाश पवार-पाटील, मधुकर नलवडे, विजय चव्हाण, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, जयवंत साबळे, भुईंजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, भुईंजचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अर्जुन भोसले, अर्जुन शेलार, प्रतापगड कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल महिंद, सेक्रेटरी एन. एन. काळोखे, चीफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, प्रोडॅक्शन मॅनेजर ए. एस. साळुंखे, इन्चार्ज अॅग्री मॅनेजर विठ्ठल कदम,इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, कारखान्याचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
आबासाहेब वीर यांचे कार्य आजही प्रेरणादायक: मदन भोसले
RELATED ARTICLES

