परळी : जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद, सातारा आयोजित तालुकास्तरीय योगासन स्पर्धा गुरुवार दि. 5 सप्टेंबर रोजी छत्रपती शाहू जिल्हा संकुलात पार पडला.
या स्पर्धेत श्री जानाई देवी शिक्षण मंडळ कारी संचलित श्री समर्थ रामदास विद्यालय कारी या विद्यालयातील 14 व 17 वर्षाखालील योगासन स्पर्धेत चांगली कामगिरी दाखवून भक्ती मोरे हिने पहिला दुसरा मयूरी मोरे व प्रणाली मोरे यांनी तिसरा क्रमांक मिळविला व 17 वर्षाखालील गटात वैष्णवी मोरे हिने दुसरा व साक्षी मोरे चौथा क्रंमाक मिळविला तसेच या सर्वच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थानी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
तालुकास्तरीय योगासनं स्पर्धेत कारी विद्यालयाची बाजी
RELATED ARTICLES