फलटण: फलटण बस स्थानकाची काही वर्षांपासून झालेली दुरवस्था पहाता तात्काळ प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या सभागृहात श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित विभागीय परिवहन अधिकार्यांसमवेत आज (दि. 19 रोजी) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिवहन विभागाचे विभागीय अभियंता गैरहजर राहिल्यामुळे त्या बैठकीस हजर राहत नाहीत तो पर्यंत उपस्थित परिवहन अधिकारी व कर्मचारी यांना थांबवून ठेवले.
फलटण एसटी बसस्थानक सुस्थितीत करा अन्यथा तुमच्या तोंडाला काळे फासावे लागेल असे इशारा यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी एसटी महामंडळाच्या प्रशासनाला दिला आहे. यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दि 19 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक – निंबाळकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, सगुणामाता कन्स्ट्रक्शनचे दिलीप शिंदे, दादासाहेब चोरमले, प्रियांका कशीद, विभागीय अभियंता परिवहन बांधकाम विभाग,पूनम सुतार कनिष्ठ अभियंता परिवहन बांधकाम विभाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एसटी महामंडळाच्या फलटण बस स्थानकाबाबत शेतकरी व शेतकर्यांच्या मुलांकडून अनेक लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . एसटी महामंडळाच्या नूतनीकरणाचे काम अर्धवट स्थितीत सुरू आहे. जे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून एसटी स्टैंड मधील ड्रेनेज, काँक्रिटीकरण व इमारतीची डागडुजी झाली नाही ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी व बाजारासाठी शेतकरी व शेतकर्यांची मुले येत असतात त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सकाळी 12 वाजता आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत परिवहन विभागाचे विभागीय अभियंता गैरहजर राहिल्यामुळे परिवहन अधिकारी व कर्मचारी यांना तीन तास थांबवून ठेवले. जोपर्यंत विभागीय अभियंता प्रियांका कशीद परिवहन बांधकाम विभाग बैठकीस हजर राहत नाहीत तो पर्यंत उपस्थित परिवहन अधिकारी व कर्मचारी यांना बाहेर पडून देणार नाही असा इशारा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिल्याने विभागीय अभियंता कशीद परिवहन बांधकाम विभाग यांना दुपारी 3 वाजता बैठकीस हजर रहावे लागले.
यानंतर बैठकीत श्रीमंत रघुनाथराजे परिवहन विभागास तत्काळ काम करण्याच्या सुचना दिल्या व यास परिवहन अधिकारी यांनी रखडलेली कामे लवकरच सुरू करण्याच्या ठेकेदार यांना आदेश दिले.
परिवहन विभागाने तात्काळ रखडलेली कामे पूर्ण करावीत: श्रीमंत रघुनाथराजे
RELATED ARTICLES

