फलटण : तरडफ, ता. फलटण येथे मध्यरात्री पिराचीपट्टी नावाच्या शिवारात शेळी फार्ममधून शेळ्या चोरणार्या तिघांपैकी एकाला गावातील नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना काल मध्यरात्री घडली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैभव आण्णासाहेब मदने (वय-30, रा. तरडफ, ता. फलटण) यांचे पिराचीपट्टी नावाच्या शेळी पालनाचा व्यवसाय आहे. काल दि. 18 रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वैभव मदने यांना गावातीलच अक्षय सदाशिव गायकवाड यांनी फोन वरून तुमच्या शेळी पालन फार्ममधून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज येत आहे, तसेच फार्मवर कामाला असणार्या पाराजी शिंदे यांच्या घरला बाहेरून कढी लावण्यात आली आहे अशी माहिती दिली. यानंतर वैभव मदने, नवनाथ गोडसे, विशाल कदम असे तिघेजण शेळी पालन फार्मवर गेले. यावेळी फार्म हाऊसच्या कंपाऊंडची तार तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरटे शेळ्या चोरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला.
यावेळी चोरटे शेळ्यांसह उसाच्या शेतात लपले. तसेच एका चोरट्याची ग्रामस्थांबरोबर झटापट झाली. परंतु यावेळी तीन चोरटे दुचाकीवरून पळून जाण्याचा यशस्वी झाले. तर एक चोरटा ऊसामध्ये लपून बसला होता. सकाळी सहा वाजता ग्रामस्थ उसाच्या शेतात चोरट्यांचा शोध घेत असताना, दिगंबर नाना जाधव (रा. सगुणामाता नगर फलटण) हा ऊसामध्ये लपला असता मिळून आला. यावेळी ग्रामस्थांनी या चोरट्याला चोप देऊन फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याने एक शेळी चोरून फरार झालेल्या संशयित तीघांची नावे सांगितली आहेत. यामध्ये मुकेश माणिक जाधव, अफसर बबलू इनामदार व राहुल राजेंद्र जाधव (सर्व रा. मलटण ता.फलटण) येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी चौघा जणांवर शेळ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पो.नि.नितीन सावंत करीत आहेत.
शेळी फार्ममधून शेळ्या चोरणार्या तिघांपैकी एका चोरट्याला बेदम चोप
RELATED ARTICLES

