फलटण: महिला ही समाजाचे प्रतीक आहे, त्यांना स्वतः च्या पायावर उभा करण्यासाठी मॅग फिनसर्व्ह कंपनी अर्थसहाय्य करीत आहे या मुळे महिलांनी घरी अथवा इतर ठिकाणी स्वतः चा व्यवसाय सुरू करावा त्या मधून होणारे उत्पादन विक्री करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू असे आश्वासन अनंत मोहोटकर यांनी दिले ते फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे महिला बचत गट मेळाव्यात बोलत होते.
मॅग फिनसर्व्ह ही कंपनी सातारा जिल्ह्यात काम करीत असताना आपल्या बँकेच्या माध्यमातून तसेच सुलभ व तात्काळ अर्थसहाय्य देणारी अग्रेसर संस्था म्हणून महाराष्ट्र व बेळगाव येथे लौकिक मिळवला असून आत्तापर्यंत 1000 हुन अधिक महिला बचत गटांना अर्थसहाय्य दिले आहे, या मुळे अनेक महिला आपल्या पायावर भक्कम उभ्या राहिल्या असून या पुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय सुरु करा त्या साठी लागेल एवढे अर्थसहाय्य देण्याचे मोहोटकर यांनी सांगितले याच बरोबर आरोग्य शिबिर,याचबरोबर काही ऑपरेशन किंवा इतर वैद्यकीय खर्च महिला बचत गटांच्या सदस्यांचा 50%खर्च कंपनी व हॉस्पिटल करनार असून उरलेला 50 % खर्च स्वतः ती महिला करेल या मुळे अचानक आलेल्या दवाखान्यात येणार्या व संकटात सापडलेल्या महिलेला मदत होईल,महिलांना कायदेशीर काही आडचणी असतील तर कंपनी स्वतः त्या साठी कायदेशीर पणे मार्ग काढण्यासाठी वकील दिला जाईल,याचबरोबर जे महिला बचत गट ज्या वस्तू (उत्पादन)तयार करतात त्याच मार्केटिंग कंपनी करेल या मुळे तुमच्या बचत गटांना फायदा होईल असे मोहोटकर यांनी सांगितले.
या वेळी डॉ.राजश्री नाळे, डॉ.किरणकुमार नाळे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस.वसईकर यांनी केले, आभार विराज पवार यांनी मानले या वेळी फलटण तालुक्यातील शंभर हुन बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
महिला ही समाजाचे प्रतीक आहे: अनंत मोहोटकर
RELATED ARTICLES