परळ : भोंदवडे येथील प्रगतशील शेतकरी अशोक बळीराम शिंदे वय 53 यांचा ट्रॅक्टरमधून मळणी मशीन घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की अशोक शिंदे हे आपल्या ट्रॅक्टरमधून मळणी मशीन आंबवडे खुर्द (माळवाडी) येथे शिवारात जात असताना दुपारी 3.30 च्या दरम्यान कॅनॉलजवळ ट्रॅक्टरचे चाक रुतले त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत रुतलेला ट्रॅक्टर बाहेर काढत होते.
यावेळी पावसाचा जोरही वाढत होता मात्र ट्रॅक्टर बाहेर काढत असताना मळणी मशीन पुढे सरकल्याने ट्रॅक्टरच्या यंत्रात अशोक शिंदे अडकले बराच उशीर ही घटना कोणाच्या निदर्शनास आली नाही.
जेव्हा ही दुर्दैवी घटना गावात समजताच ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले तसेच गावावर शोककळा पसरली काही वेळापूर्वी आपल्यात असणारे अचानक काळाने घाला घातल्याने कोणालाच तत्काळ विश्वास बसत नव्हता सदर घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी नोंद झाली नव्हती.
ट्रॅक्टरचे चाक कॅनॉलमध्ये अडकून भोंदवडे येथे एकाचा मृत्यू
RELATED ARTICLES

