कराड: कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस आ. बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी सर्व ताकदीनिशी ठाम राहणार आहे.
कराड येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी एकमुखाने कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
आ. चव्हाण म्हणाले, देशातील आर्थिक घडी विस्कटली आहे. पंतप्रधानांचे देशाकडे लक्ष नाही. अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. देशात हुकूमशाही येणार की काय अशी परिस्थिती आहे. विरोधी पक्ष मोडून काढण्याचे सर्व प्रकाराने प्रयत्न सुरु आहेत. अशा बिकट परिस्थितीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.
ते म्हणाले, भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांनी शरद पवार यांच्यावर अकारण ईडीची नोटीस बजावली. हे खूप चुकीचे आहे. हे सुडाचे राजकारण थांबले पाहिजे. कराड उत्तरमधील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी सर्व ताकदीने रहावे. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी अजितराव पाटील-चिखलीकर, जितेंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, माजी सदस्य मारुतीशेठ जाधव, नंदकुमार डुबल, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत जाधव, माजी अध्यक्ष अविनाश नलवडे, दुर्गेश मोहिते, कराड उत्तर सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष उमेश साळुंखे, कॅप्टन इंद्रजीत जाधव, आनंदराव यादव (कवठे), प्रतापराव देशमुख (हिंगनोळे), अक्षय कदम (पेरले), भरत माने (काशीळ), उमेश साळुंखे, किवळचे माजी सरपंच रामभाऊ साळुंखे, जे. के. पाटील, अजित जाधव (पाडळी), शहाजीराव पवार, संदीप थोरात (शिरवडे), डॉ. लोहार, राजेंद्र चव्हाण (कोपर्डे हवेली), मबुभाई (वाघेरी), हणमंतराव पोळ (शामगाव), शामगांवचे सरपंच, विजयराव पाटील-शिरगावकर, संजय साळुंखे (चोरे), चंद्रकांत साळुंखे, प्रताप पवार (बेलवडे बुद्रुक) यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड उत्तरमधील काँग्रेस बाळासाहेब पाटील यांच्या पाठीशी: आ.पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES