Thursday, October 16, 2025
Homeठळक घडामोडीबरसणार्‍या जलधारांच्या साक्षीने 79 व्या औंध संगीत महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ

बरसणार्‍या जलधारांच्या साक्षीने 79 व्या औंध संगीत महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ

औंध: देशाच्या ग्रामीण भागातील शास्त्रीय संगीताचे एकमेव व्यासपीठ असणार्‍या 79 व्या औंध संगीत महोत्सवास शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात, जलधारांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी माजी आ.प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळयास सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी माजी सभापती संदिप मांडवे, उपसरपंच दिपक नलवडे, पं.अरुण कशाळकर ,अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार, प्रदिप कणसे व विविध मान्यवर उपस्थित होते.
मागील 78 वर्षे अखंडपणे सुरू असलेला हा संगीत महोत्सव आजही अव्याहतपणे सुरू आहे.
संगीत महोत्सव शुभारंभप्रसंगी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले ग्रामीण भागातील कलावंत,गायकांना तसेच नव्या पिढीला शास्त्रीय संगीताचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून जोशी घराण्याने सुरू ठेवलेला हा संगीत महोत्सवाचा यज्ञ दिवसेंदिवस बहरत चालला आहे. यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असून शासकीय स्तरावरून ही या महोत्सवासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी पहिल्या सत्राची सुरूवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांच्या नाती श्रीमती अपूर्वा गोखले व श्रीमती पल्लवी जोशी यांच्या सहगायनाने करण्यात आली.
त्यांनी सुरूवातीला बैरागी भैरव हा राग गायला.यामध्ये तिलवाडा तालातील पपीहा भयोहा बडा ख्याल तसेच काटे कर तू साधन ही तीन तालातील मध्यलय बंदिश आणि त्यानंतर एक तालातील तराणा गायला. मियाँ की तोडीमध्ये पं.अरुण कशाळकर यांची गुनन गाऊ तुमरो ही मध्यलयीतील बंदिश सादर केली. त्यानंतर फारुख लतीफ यांनी सारंगी वादन केले. यावेळी राग बसंत मुखारी ताल मविलंबित एकताल मपेश केला तसेच राग दादरा सादर केला. पहिल्या सत्राची सांगता श्रीमती अलका ताई मारुलकर यांच्या गायनाने यावेळी त्यांनी राग गुजरी तोडी त्यामध्ये तिनताल तालातली मसुगर बनरी हा मबडा ख्याल तसेचफ मैं जानत तोहेफही तीन तालातील मध्यलय बंदिश पेश केली. राग देसी मध्ये झपतालातील बंदिश व चैती सादर केली. यावेळी तबला साथ अनुक्रमे प्रवीण करकरे,संवादिनी साथ सिद्धेश बिचोलकर, तबला साथ स्वप्नील भिसे यांनी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular