सातारा: सर्व धर्म समभाव हि आमच्या घराण्याची परंपरा आहे. मी कोणत्याही पक्षात असलो तरी हि परंपरा मी विसरणार नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामुळे देश आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. मला सातारा- जावली हा आपला मतदारसंघ प्रगतीपथावर न्यायचा आहे. यासाठी मला भाजप सरकारची आणि जनेतेची साथ मिळणार असून निवडणुकीपुरत्या उगवलेल्या भूछत्राना 21 तारखेला जनताच घरी पाठवणार आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे विधानसभेचे उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा- जावली मतदारसंघ पिंजून काढताना शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील धावडशी, कण्हेर, नेले, किडगाव आदी भागामध्ये घर टू घर भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजे यांनी काय कामे केली असे बिनबुडाचे सवाल करणार्या विरोधकांना जनता मतदान यंत्रातूनच उत्तर देणार आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातूनच सातारा- जावळीत विकासाचा झंजावात सुरु असून आता सत्ताधारी भाजपच्या माध्यमातून अधिक गतिमान विकास होणार आहे. त्यामुळे भुरट्या विरोधकांच्या फसवेगिरीला कोणी थारा देणार नाही. आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तुम्हाला राज्यात एक नंबरचे मताधिक्य देऊ, असा शब्द शिवेंद्रसिंहराजे यांना ग्रामस्थांनी दिला.
मी भाजपमध्ये प्रवेश केला ते फक्त सातारा- जावलीच्या विकासासाठीच. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपचे सरकार जनहिताचे निर्णय घेऊन जनसामान्यांना चांगल्या योजनाद्वारे चांगल्या सुविधा देत आहे. विरोधात बसून आपल्या मतदारसंघातील प्रश्न सुटणार नाहीत म्हणूनच मी हा निर्णय घेतला असून मला जनतेची साथ आहे. निवडणूक संपली की विरोधक पुढील पचवर्षांसाठी गायब होतील. ते पुन्हा निवडणूक लागलीकीच उगवतील हि रीतच झाली आहे. कुचकामी आणि स्वार्थी विरोधकांचे मनसुबे सातारा- जावळीचे नुकसान करणारे आहेत. जनता कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली असून जनताच त्यांचे मनसुबे उधळून लावणार आहे. सातारा- जावलीच्या गतिमान विकासासाठी कमळाला विजयी करणे काळाची गरज आहे. जनता मला मताधिक्य देऊन पुन्हा सेवा करण्याची संधी देईल आणि सातारा- जावलीतील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवून या संधीचे सोने मी करीन, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिली.
निवडणुकीपुरत्या उगवलेल्यांना जनताच घरी पाठवणार : शिवेंद्रसिंहराजे
RELATED ARTICLES